शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Dhirendra Shastri : बागेश्वर सरकार कशी ओळखतात लोकांच्या मनातील गोष्ट; समोर आलं बाबांचं सर्वात मोठं रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 18:44 IST

मध्यप्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील ग्राम गडमध्ये असलेले बागेश्वर धाम सरकार (Bageshwar Dham Sarkar) देशभरात प्रसिद्ध झाले आहे. बागेश्वर धामच्या दरबारात लोक मोठ्या संख्येने हजेरी लावतात आणि यासाठी आपला नंबरही लावतात. मात्र, सर्वात मोठा प्रश्न आहे की, बाबा लोकांच्या मनातील गोष्ट कशी ओळखतात?

रायपूर - बागेश्वर धामचे कथाकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या जबरदस्त चर्चेत आहेत. बागेश्वर महाराज या नावाने प्रसिद्धी मिळवलेले धीरेंद्र शास्त्री लोकांच्या मनातील गोष्टी ओळखतात, असा दावा केला जातो. बागेश्वर धामच्या दिव्य दरबारात संधी मिळाली तर नशीब बदलते, अशी लोकांची भावना आहे. महाराज लोकांच्या समस्या न सांगताच ओळखतात आणि त्या त्यांना सांगतात. याचवेळी ते एका कागदावर समस्येचे समाधान लिहून आपली समस्या लवकरच दूर होईल असे सांगतात.

मध्यप्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील ग्राम गडमध्ये असलेले बागेश्वर धाम सरकार (Bageshwar Dham Sarkar) देशभरात प्रसिद्ध झाले आहे. बागेश्वर धामच्या दरबारात लोक मोठ्या संख्येने हजेरी लावतात आणि यासाठी आपला नंबरही लावतात. मात्र, सर्वात मोठा प्रश्न आहे की, बाबा लोकांच्या मनातील गोष्ट कशी ओळखतात?

बागेश्वर सरकारचा दावा आहे, की त्यांच्याजवळ अशी शक्ती आहे की, ते लोकांच्या मनातील गोष्ट ओळखू शकतात. ते सांगतात की त्यांच्याकडे वरून कनेक्शन आहे. त्यांना वरूनच सिग्नल मिळतो. ते या सिंग्नलच्या माध्यमानेच लोकांच्या मनात काय सुरू आहे? हे ओळखतात. बागेश्वर महाराजांच्या याच शक्तींमुळे बागेश्वर धाममध्ये जाणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढू लागली आहे.

...पण कशी ओळखतात मनातील गोष्ट?बागेश्वर महाराज लोकांच्या मनातील गोष्ट कशी ओळखतात? हा एक मोठा प्रश्न आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही तज्ज्ञांचा दावा आहे की, ही एक कला आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर त्याच प्रकारचे भाव येत असतात, जे काही लोक समजू शकतात. जसे, दृष्टी नसलेले लोक ब्रेल लिपीच्या सहाय्याने काहीही वाचू शकतात. तसेच काही मेंटॅलिस्ट देखील असतात, जे लोकांच्या चेहऱ्यावरील भाव वाचू शकतात. जगभरात असे अनेक मेंटॅलिस्ट आहेत. जे अशा पद्धतीने लोकांच्या चेहऱ्यावरील भाव वाचू शकतात अथवा ओळखू शकतात.

हाव-भाव आणि शारीरिक हालचालींशिवाय, समोरच्या व्यक्तीचा व्यवहार कसा आहे? याच बरोबर त्याच्या बोलण्याची पद्धत कशी आहे? हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवत असते. जर एखाद्याला मेंटॅलिस्ट आर्ट येत असेल, तर ती व्यक्तीही अशा पद्धतीने दुसऱ्याच्या मनातील गोष्टी जाणू शकते. याच पद्धतीने काही लोकांकडे सम्मोहन कलाही असते, तेही लोकांच्या मनातील काही गोष्टी सहजपणे ओळखू शकतात.

टॅग्स :HinduismहिंदुइझमMadhya Pradeshमध्य प्रदेश