शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
4
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
5
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
6
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
7
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
8
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
9
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
11
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
13
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
14
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
15
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
16
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
17
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
18
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
19
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
20
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!

आरोपी नसताना अभिनेत्रींचे फोन जप्त कसे केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 02:43 IST

काय? का? कसे?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी सध्या बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाचा तपास करतेय. यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एनसीबीने दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही चौकशी केली; पण या प्रकरणात त्या अद्याप आरोपी नाहीत, तरीही त्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. ते कसे काय? आरोपी नसतानाही वस्तू जप्त करता येतात?

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १०२ ने पोलिसांना काही अधिकार दिले आहेत. पोलिसांना एखाद्या खटल्याच्या तपासादरम्यान महत्त्वाची वाटलेली वस्तू जप्त करण्याचा अधिकार आहे. चोरी गेलेली किंवा त्याद्वारे एखादा गुन्हा घडू शकेल अशी वस्तू अथवा पुरावा म्हणून वापर करता येईल अशी वस्तू किंवा संशयास्पद वस्तू जप्त करण्याचा पोलिसांना अधिकार असतो. एनसीबीलाही असेच अधिकार मिळाले आहेत. एनडीपीएस कायद्याने एनसीबीला हे अधिकार आहेत. त्यामुळे दीपिका, सारा, श्रद्धा या तिघीही ड्रग्ज प्रकरणात आरोपी नसताना त्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.जप्त केलेल्या वस्तू परत कधी मिळतात?

जप्त वस्तूंमध्ये तपास अधिकाऱ्यांना काय आढळले, किती महत्त्वाची माहिती मिळाली, यावर जप्त वस्तू कधी मिळणार ते अवलंबून आहे. जर त्यात तपासाला पुरक असे पुरावा मिळाले नाहीत तर पोलीस अधिकारी किंवा त्या वस्तूंचा मालक ती वस्तू परत मिळवण्यासाठी संबंधित कोर्टात अर्ज करू शकतो. जर त्यात अत्यंत आवश्यक पुरावे सापडले तर खटला पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागू शकते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDrugsअमली पदार्थPoliceपोलिस