शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी अबू दुजानाचा 'मोबाइल' ठरला कर्दनकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 12:44 IST

भारतीय लष्कराला जम्मू-काश्मीरमध्ये मोठं यश मिळालं. काश्मीरमधला लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अबू दुजाना याचा खात्मा झाला.

ठळक मुद्देदुजानाच्या हत्येसाठी त्याच्या मोबाईल फोननं महत्त्वाची भूमिका बजावली. पसार होत असताना त्याचा मोबाईल गाडीत राहिला. त्यामुळे सुरक्षा जवानांच्या हाती दहशतवादी हालचालींबाबत मोठा पुरावा लागलापत्नीला भेटण्यासाठी आला होता, त्यावेळी सुरक्षा दलाला त्याची माहिती मिळाली आणि लष्करानं पुलवामामधल्या बाकरीपोरा येथे त्याला चहूबाजूंनी घेरलं.

जम्मू-काश्मीर, दि. 1 - भारतीय लष्कराला जम्मू-काश्मीरमध्ये मोठं यश मिळालं. काश्मीरमधला लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अबू दुजाना याचा खात्मा झाला. भारतीय लष्कराची ब-याच दिवसांपासून अबू दुजानावर नजर होती. अखेर त्याला कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं. विशेष म्हणजे दुजानाच्या हत्येसाठी त्याच्या मोबाईल फोननं महत्त्वाची भूमिका बजावली.गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवलं होतं. त्यावेळी स्वतःला वाचवण्यात त्याला यश आलं होतं. परंतु पसार होत असताना त्याचा मोबाईल गाडीत राहिला. त्यामुळे सुरक्षा जवानांच्या हाती दहशतवादी हालचालींबाबत मोठा पुरावा लागला. त्या मोबाईलच्या माध्यमातून लष्कराला कॉन्टॅक्ट आणि त्या नंबरचे ट्रॅकिंग करून दहशतवादी चळवळीची माहिती मिळाली. सुरक्षा दलाचे जवान त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून होते. मंगळवारी जेव्हा तो त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी आला होता, त्यावेळी सुरक्षा दलाला त्याची माहिती मिळाली आणि लष्करानं पुलवामामधल्या बाकरीपोरा येथे त्याला चहूबाजूंनी घेरलं. त्यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दुजाना ज्या घरात थांबला होता, तिथून जवळपास 4 तास त्यानं एकदाही गोळीबार केला नाही. लष्करानं त्या घरावर रॉकेट लाँचर सोडलं आणि घराला आग लावून दिली. त्याच वेळी अबू दुजानासह लष्कराच्या गोळीबारात आरिफ ललहारीचा खात्मा झाला.अबू दुजाना लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर होता. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला मारण्यासाठी ऑपरेशन राबवलं होतं. त्याच्यावर लष्करानं 10 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. सीआरपीएफ 182 बटालियन, 183 बटालियन, 55 राष्ट्रीय रायफल्स आणि एसओजीच्या टीमनं मिळून ही कारवाई केली होती. तत्पूर्वी 19 जुलैला सुद्धा लष्करानं अबू दुजानाला घेरलं होतं. पुलवामातल्या बंदेरपुरा गावात लष्कर आणि एसओजीच्या जवानांनी अबू दुजानाला पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र दुजाना त्यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांना चकमा देऊन फरार होण्यात यशस्वी ठरला होता. काश्मीर खो-यात लष्करानं ऑपरेशन ऑलआऊट राबवलं आहे. या ऑपरेशनअंतर्गत लष्करानं दहशतवाद्यांची यादी तयार केली  आहे. त्याच पार्श्वभूमीवर लष्करानं वेगवेगळ्या ठिकाणी ऑपरेशनही राबवलं आहे. या ऑपरेशनअंतर्गत लष्करानं आतापर्यंत 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.