शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करणे कितपत सुरक्षित? जाणून घ्या, संपूर्ण माहिती... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 17:01 IST

voter id and aadhar card link : मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, जी तुम्ही घरी बसूनही सहज पूर्ण करू शकता.

नवी दिल्ली : मतदार ओळखपत्र आधार कार्डसोबत लिंक (Aadhar Card Link with Voter ID) करण्याची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात 1 ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे, तर मध्य प्रदेशसह अनेक ठिकाणी मतदार ओळखपत्र लिंक केले जात आहे. मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, जी तुम्ही घरी बसूनही सहज पूर्ण करू शकता.

अलीकडेच, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सर्वोच्च न्यायालयात आधार कार्डशी मतदार ओळखपत्र लिंक करण्याच्या प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना, त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. आता अशा परिस्थितीत तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की, आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करणे कितपत सुरक्षित आहे?

मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करण्याचा कायदा करण्यात आला आहे. तेव्हापासून मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकसभेत विधेयक मांडताना सरकारने हे स्पष्ट केले होते की, मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करणे लोकांच्या इच्छेवर अवलंबून असेल.

मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करणे किती सुरक्षित?विरोधकांचे म्हणणे आहे की, मतदार ओळखपत्र आधारशी लिंक केल्याने "गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन" होऊ शकते. बेकायदेशीर पोर्टलवर मोठ्या प्रमाणावर डेटा लीक होण्याची आणि वैयक्तिक माहिती सार्वजनिक होण्याची भीती आहे. दुसरीकडे, इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार, आधार कार्डला मतदार ओळखपत्राशी लिंक केल्यास वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका असू शकतो. मतदार ओळखपत्र आधारशी लिंक केल्याने मतदार यादीचा गैरवापर होऊ शकतो. मात्र, सरकारचे म्हणणे आहे की, मतदार ओळखपत्र आधारशी लिंक केल्याने मतदानाची फसवणूक थांबेल. तसेच, आपल्या शहरापासून दूर राहणारे लोकही आधारच्या मदतीने मतदान करू शकतात.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डVotingमतदान