शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

पेट्रोल, डिझेलच्या किंमती कशा कमी करणार? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला हा सल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 07:58 IST

Petrol, diesel Price Hike: इंधनावरील सर्वाधिक कर हा केंद्र सरकारला जातो, राज्यांना खूप कमी कर मिळतो. यामुळे केंद्र सरकारने कर कमी करावा अशी मागणी साऱ्या राज्यांनी केली आहे. तर काही राज्यांनी व्हॅटमध्ये कपात करून काही प्रमाणावर इंधनाच्या किंमतीदेखील कमी केल्या आहेत. तसेच केंद्राने पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये घ्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. 

अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांनी देशातील वाढलेल्या पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) किंमती कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून मार्ग काढावा याची री ओढली आहे. केंद्र सरकारचा पेट्रोल, डिझेलवर कर जास्त दिसत असला तरीदेखील त्यातील जास्त हिस्सा हा राज्यांनाच दिला जातो, यामुळे राज्यांनीच त्यांच्या करात कपात करावी असा सल्ला सीतारामन यांनी दिला. (States getting 42 percent tax which collected from Center on Petrol, Diesel. )

इंधनावरील सर्वाधिक कर हा केंद्र सरकारला जातो, राज्यांना खूप कमी कर मिळतो. यामुळे केंद्र सरकारने कर कमी करावा अशी मागणी साऱ्या राज्यांनी केली आहे. तर काही राज्यांनी व्हॅटमध्ये कपात करून काही प्रमाणावर इंधनाच्या किंमतीदेखील कमी केल्या आहेत. तसेच केंद्राने पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये घ्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. 

यावर इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी यावर भाष्य केले आहे. केंद्र सरकार जो काही कर वसूल करते त्यातील 42 टक्के एवढा मोठा हिस्सा हा राज्यांना दिला जातो. यामुळे इंधन दरवाढीवर राज्ये चांगला पर्याय काढू शकतात, असे त्या म्हणाल्या. 

अखेर जनेतलाच दिलासा द्यायचा आहे. यामुळे सांघिक रचनेचा विचार केंद्र आणि राज्य सरकारने करायला हवा. आम्ही पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये घेण्याबाबत जीएसटी काऊन्सिलमध्ये आपली बाजू मांडू. यावर काऊन्सिलने काही निर्णय घेतला त्यावर आम्ही पुढे कार्यवाही करू, असे त्या म्हणाल्या. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात आम्ही खासगी क्षेत्रावर विश्वास ठेवत आहोत, हे दाखविले. आता 2019 नंतर आम्ही निती बनवत आहोत. यामध्ये सरकार पोलिसिंग किंवा त्रास देण्याच्या भूमिकेत नसणार असे आम्ही त्यांना दाखविले आहे. 

डिजिटल करन्सी आणणार....क्रिप्टो करन्सीबाबत लकरच मंत्रिमंडळात प्रस्ताव दिला जाणार आहे. यावर डिजिटल करन्सी आणायची की नाही ते रिझर्व्ह बँक ठरवेल. आम्हाला हा प्रयोग सुरु करावा असे वाटत आहे. मात्र, मंत्रिमंडळ यावर निर्णय घेईल. अनेक फिनटेक कंपन्यांनी प्रगती केली आहे. भारतातही यावर बरेच काही घडेल. आम्ही याला निश्चितरित्या प्रोत्साहन देऊ, असे त्या म्हणाल्या.  

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनPetrolपेट्रोलDieselडिझेलFuel Hikeइंधन दरवाढ