विविध क्षेत्रात नव्या संधी घेऊन आलेले वर्ष २०२५ हे उज्ज्वल असेल, अशी भावना जगभरातील अनेक नागरिकांमध्ये दिसून येत आहे. एका जनमत सर्वेक्षण संस्थेने डिसेंबर २०२४ मध्ये केलेल्या जागतिक सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. आर्थिक प्रगती, सामाजिक स्थिरता आणि भविष्यातील संधी यांबाबत लोकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला आहे. विशेषतः आशिया आणि लॅटिन अमेरिका खंडातील देशांमध्ये नागरिकांमध्ये नव्या वर्षाबाबत मोठ्या आशा आहेत. असे सर्वेक्षण साधारणतः लोकांचे एकूण जीवनमान, आर्थिक स्थिती, रोजगाराच्या संधी, सामाजिक स्थैर्य, राजकीय परिस्थिती आणि भविष्यातील सकारात्मक घडामोडी यासंदर्भात केले जाते. त्यामुळे सर्वांगीण प्रगतीसंबंधी लोक आशावाद व्यक्त करीत आहेत.
सर्वाधिक आशावादी देश कोणता?
इंडोनेशिया ९०
कोलंबिया ८८
चीन ८७
फिलिपिन्स ८७
पेरू ८५
द. आफ्रिका ८४
मेक्सिको ८४
मलेशिया ८१
थायलंड ७९
अर्जेंटिना ७९
ब्राझील ७९
भारत ७६
सर्वात कमी आशावादी कुठे ?
जपान ३८
फ्रान्स ५०
बेल्जियम ५१
जर्मनी ५६
द. कोरिया ५६
तुर्की ५९
स्पेन ६६
स्वीडन ६६
नेदरलँड ६७
आयर्लंड ६९
स्वित्झर्लंड ६९