शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कसे उघडाल पीपीएफ अकाऊंट? काय आहेत याचे फायदे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 11:26 IST

पीपीएफ अकाऊंटमध्ये गुंतवणूक आणि त्यातून मिळणा-या व्याजावर टॅक्समध्ये सूट मिळते. चला जाणून घेऊया पीपीएफ अकाऊंट आणि याचे नियम-फायदे....

काही दशकांपासून पब्लिक प्रॉविडंट फंड म्हणजेच पीपीएफ अकाऊंट अनेक गुंतवणुकदारांसाठी गुंतवणुकीचं साधन बनलं आहे.  याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पीपीएफ अकाऊंटमध्ये गुंतवणूक आणि त्यातून मिळणा-या व्याजावर टॅक्समध्ये सूट मिळते. चला जाणून घेऊया पीपीएफ अकाऊंट आणि याचे नियम-फायदे....

यासाठी पीपीएफ आकर्षक 

पीपीएफ अकाऊंटमध्ये गुंतवणूक करण्यात आलेल्या रकमेवर इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 च्या सेक्शन 80 सी नुसार टॅक्स डिडक्शन मिळतं. इतकेच नाहीतर यात गुंतवणूक केल्याने व्याजही मिळतं.

कमीत कमी 15 वर्ष गुंतवणूक

ही केंद्र सरकारची लांब कालावधीची गुंतवणूक योजना आहे. पीपीएफ 15 वर्षांची मॅंच्युरिटी असलेली स्कीम आहे. पीपीएफ अकाऊंटमध्ये एका वर्षांत जास्तीत जास्त 12 वेळा पैसे टाकता येतात. 

किती आहे डिपॉझिट लिमीट?

अकाऊंट अॅक्टीव ठेवण्यासाठी वर्षाला कमीत कमी 500 रुपये अकाऊंटमध्ये टाकावे लागतील. तर एका आर्थिक वर्षात या अकाऊंटमध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये टाकता येतात. जर तुम्ही मुलाच्या नावावर आणि स्वत:च्या नावावर अशी दोन अकाऊंट काढले असेल तरीही वर्षाला केवळ 1.5 लाख रुपयेच तुम्ही जमा करु शकता. 

लिमिटपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास काय?

जर तुम्ही 1.5 लाख रुपयांच्या वार्षिक सीमेपेक्षा जास्त रक्कम पीपीएफ अकाऊंटमध्ये जमा केली तर अतिरिक्त रकमेवर व्याज मिळणार नाही. आणि टॅक्स मधूनही सूट मिळणार नाही.  ही रक्कम तुम्हाला व्याज न देता परत केली जाईल.

काय आहे पाच तारखेचा फंडा?

जर तुम्हाला पीपीएफ अकाऊंटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर 5 तारीख महत्वाची आहे. 1 ते 5 तारखेदरम्यान तुम्हाला अकाऊंटमध्ये कोणत्याही परिस्थीतीत पैसे टाकावे लागतील. 

व्याज दर किती?

पीपीएफ अकाऊंटमध्ये जमा असलेले पैसे इक्विटीजमध्ये लावले जात नाही, त्यामुळे रिटर्नच्या बाबतीत याची तुलना स्टॉक मार्केटसोबत केली जाऊ शकत नाही. 1986 ते 2000 दरम्यान व्याज दर 12 टक्के होता. पण आता यावर 7.6 टक्के व्याज दर लागू आहे.

 एक व्यक्ती, एक अकाऊंट

तुम्ही एकच पीपीएफ अकाऊंट काढू शकता. जर एकाच नावावर दोन अकाऊंट असतील तर पहिलं अकाऊंट सोडून दुसरे अकाऊंट बंद केले जातील. त्यातील रक्कम तुम्हाला परत केली जाईल, पण व्याज दिलं जाणार नाही. 

कसे उघडणार पीपीएफ अकाऊंट?

सरकारने काही पोस्ट ऑफिस आणि काही बॅंकांमध्ये पीपीएफ अकाऊंट उघडण्याचा अधिकार दिला आहे. काही बॅंका ऑनलाईन अकाऊंट उघडण्याचाही पर्याय देतात. 

कधी करु शकता अकाऊंट बंद? लोनची सुविधा

तुम्ही पीपीएफ अकाऊंटवर लोनही घेऊ शकता आणि जमा रकमेतील काही भाग काढूही शकता. आता तर मॅच्योरिटीच्या आधीच पीपीएफ अकाऊंट बंद करण्याची सोय आहे. अकाऊंट उघडल्यानंतर कमीत कमी पाच वर्षात पूर्ण झाल्यानंतर काही खास म्हणजे खातेधारक, पत्नी, मुलं यांच्या गंभीर आजारांच्या उपचारासाठी आणि किंवा खातेधारकांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे काढता येऊ शकतात.

टॅग्स :InvestmentगुंतवणूकBanking Sectorबँकिंग क्षेत्र