शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
4
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
5
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
6
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
7
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
8
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
9
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
10
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
11
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
12
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
13
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
14
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
15
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
16
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
17
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
18
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
19
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
20
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

१ एप्रिलपासून पीएफ काढताना किती लागेल टॅक्स?; जाणून घेऊ याविषयी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 06:47 IST

आता १ एप्रिलपासून पीएफमधील रक्कम काढण्यावर टीडीएस आकारला जाणार आहे.

कोरोनाकाळात अनेकांची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे जमापूँजीवर उदरनिर्वाह चालवण्याची वेळ आली. साहजिकच नोकरदारांचे हुकमाचे पान असलेल्या भविष्य निर्वाह निधीवरही (पीएफ) त्याचा ताण आला. अनेकांनी पीएफमधील रक्कम काढण्याला प्राधान्य दिले. अजूनही हा सिलसिला सुरू आहे. परंतु आता १ एप्रिलपासून पीएफमधील रक्कम काढण्यावर टीडीएस आकारला जाणार आहे. जाणून घेऊ याविषयी...

नवीन नियम काय?

पीएफवरील निधीसंदर्भात नवीन नियम १ एप्रिलपासून अंमलात येणार आहे. नवीन नियमानुसार  पीएफमधील निधी अडीच लाखांहून अधिक असेल तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारणार आहे. सद्य:स्थितीत कर्मचाऱ्यांना पीएफवर ८.५% व्याज मिळते. मात्र, आता हा व्याजदर कमी करून ८.१% टक्के करण्यात आले आहे.

पैसे काढण्यापूर्वी  हे लक्षात ठेवा...

पीएफमधून पैसे काढण्यावर आता अनेक निर्बंध आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यावर कर आकारणी केली जाणार आहे. तसेच नोकरीतील सेवाकाळाला पाच वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच कर्मचाऱ्याने पीएफमधील रक्कम काढल्यास त्यावर १०%  टीडीएस आकारला जाणार आहे. खात्यातून काढून घेण्यात येणारी पीएफची रक्कम ५०,००० रुपयांहून अधिक असेल तरच टीडीएस लागू होणार आहे. टीडीएस कापला जाऊ नये यासाठी कर्मचारी १५जी वा १५ एच यापैकी एक अर्ज भरून देऊ शकतो.

नोकरीचा सेवाकाळ ५ वर्षांहून अधिक असेल तर...

एखाद्या कर्मचाऱ्याने ‘कायमस्वरूपी कर्मचारी’ म्हणून नोकरीतील सेवाकाळाचे पाच वर्षे पूर्ण केली असतील तर त्याने पीएफ खात्यातून काढलेल्या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही. या ठिकाणी ‘कायमस्वरूपी कर्मचारी’ हा शब्द महत्त्वाचा आहे. कारण कर्मचारी वर्षभरासाठी प्रोबेशन वा कंत्राटी पद्धतीवर रुजू झाला आणि नंतर चार वर्षे तो कायम कर्मचारी म्हणून संस्थेत राहिल्यास नियोक्ता त्याच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यावर टीडीएस आकारू शकेल. तथापि, काही विशिष्ट परिस्थितींत पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच, म्हणजे कर्मचारी आजारी पडल्यास वा कंपनीच बंद पडल्यास, कर्मचाऱ्याने पीएफ खात्यातून पैसे काढल्यास त्यावर कर आकारणी केली जाणार नाही.

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीTaxकर