शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

45 देशांच्या क्षेत्रफळाहूनही अधिक...,15 वर्षांत झाली डबल...; वक्फ बोर्डाकडे किती संपत्ती? जाणून डोकं चक्रावेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 23:44 IST

Waqf Board : आधिकृत आकेडेवारीनुसार, भारतातील वक्फ बोर्डाकडे जगातील इतर अनेक देशांतील वक्फ बोर्डांपेक्षा किती तरी पट अधिक संपत्ती असल्याचे समोर आले.

केंद्र सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात संशोधन करण्यासंदर्भात संसदेत प्रस्ताव सादर केल्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान वक्फ बोर्डाकडील संपत्ती जाणून देशातील जनतेला आश्चर्याचा धक्का बसला. आधिकृत आकेडेवारीनुसार, भारतातील वक्फ बोर्डाकडे जगातील इतर अनेक देशांतील वक्फ बोर्डांपेक्षा किती तरी पट अधिक संपत्ती असल्याचे समोर आले. 

रेल्वे, संरक्षण आणि कॅथोलिक चर्चनंतर वक्फ कडे सर्वाधिक संपत्ती - देशातील सध्याच्या वक्फ बोर्ड अॅक्टमधील वादग्रस्त तरतुदीनुसार, एखादी जमीन वक्फ बोर्डाकडे गेली तर ती पुन्हा फिरवली जाऊ शकत नाही. देशातील सध्याचे सुन्नी वक्फ बोर्ड आणि शिया वक्फ बोर्ड या दोघांची एकूण संपत्ती जाणून कुणाचेही डोके गरगरू शकते. यात वेगाने वाढही होत आहे. एका आकडेवारीनुसार, देशात रेल्वे, संरक्षण आणि कॅथोलिक चर्चनंतर, सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडेच आहे.

45 देशांपेक्षा अधिक जमीन -माध्यमांतील वृत्तांनुसार देशात वक्फ बोर्डाकडे तब्बल 3804 चौरस किलोमीटर एवढी जमीन आहे. ही जगातील 45 देशांच्या क्षेत्रफळापेक्षाही अधिक आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास, समोआ 2803, मॉरीशस 2007, हॉन्गकॉन्ग 1114, बहरीन 787 आणि सिंगापूर 735 चौरस किलोमीटरवर पसरलेले आहेत. वक्फ बोर्डाकडील जमी यापेक्षा खूप अधिक आहे. 

2022 मध्ये राज्यसभेत देण्यात आली होती माहिती - वर्ष 2022 मध्ये तत्कालीन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी लेखी उत्तरात वक्फ बोर्डाच्या मालमत्तेसंदर्बात माहिती दिली होती. यात त्यांनी सांगितले होते की, वक्फ बोर्डाकडे देशभरात एकूण 7 लाख 85 हजार 934 एवढ्या मालमत्ता आहेत. यांपैकी उत्तर प्रदेशात वक्फकडे सर्वाधिक 2 लाख 14 हजार 707 मालमत्ता आहेत. यातील, 1 लाख 99 हजार 701 सुन्नी, तर 15006 शिया वक्फकडे आहेत. यानंतर, वक्फकडे बंगालमध्ये 80 हजार 480 मालमत्ता आहेत आणि तामिळनाडूमध्ये 60 हजार 223 मालमत्ता आहेत.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारParliamentसंसदBJPभाजपाMuslimमुस्लीम