शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना किती पैसे दिले? केंद्र सरकार तपासणार, मोफत सुविधांवर २५ लाख कोटी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 07:38 IST

Central Government: केंद्र आणि राज्य सरकारांनी समाजातील विविध घटकांना दिलेल्या सुविधांचे नेमके मूल्य जाणून घेण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली  - केंद्र आणि राज्य सरकारांनी समाजातील विविध घटकांना दिलेल्या सुविधांचे नेमके मूल्य जाणून घेण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. एका अंदाजानुसार, केंद्र सरकार रोख रक्कम व वस्तूंच्या स्वरुपात मदत देण्यासाठी विविध योजनांवर १० लाख कोटी रुपयांचा खर्च करते. याबरोबरच ३६ राज्य सरकारे व केंद्र शासित प्रदेश आपल्या योजनांवर १५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करतात.

योग्य लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचावेत, यासाठी सरकारने अनेक केंद्रीय योजनांचे एकत्रीकरण केले आहे व प्रक्रिया सोपी केली आहे. या योजनेत पीएम किसान योजनेचा समावेश नाही. त्यात ९ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये रोख रक्कम मिळते. एका अंदाजानुसार, सुमारे २० कोटी कुटुंबांना (७५ कोटी लोक) केंद्राच्या योजनांचा लाभ मिळतो.

किती लोक दारिद्र्यरेषेच्या वर आणले गेले आहेत, हे शोधण्याचा हा पहिला प्रयत्न आहे. यामुळे लाभार्थ्यांची सर्वसमावेशक यादी तयार करण्यासही मदत मिळणार आहे. कुटुंबांना मिळत असलेल्या मोफत सुविधांवर ग्राहक खर्च सर्वेक्षणाने यापूर्वीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारने विविध स्तरांवर दिलेल्या सबसिडी आणि मोफत सुविधांचे मूल्य जाणून घेण्याचे काम सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. 

व्यापक मोहीमराज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) राव इंद्रजित सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ग्राहक खर्च सर्वेक्षणांतर्गत एकापाठोपाठ सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे. त्यात सातत्य आणि गरिबांना कशी मदत झाली, याची माहिती मिळवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मंत्रालयाने डेटामधील विसंगतीचे कारण देत २०१७-१८चा सर्वे रद्द केला होता. त्यामुळे यावेळी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार