शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत जमिनीचे भाव गगनाला भिडले! 35 लाखांच्या जमिनीची किंमत आता 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 12:15 IST

Ram Mandir Ayodhya : भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे. याच दरम्यान अयोध्येतील जमिनीच्या वाढत्या किमतींबद्दल जाणून घेऊया.

अयोध्येची सध्या जगभर चर्चा होत आहे. देशवासियांसाठी आजचा दिवस फार मोठा आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी १२:२० वाजता रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांपुरती राहिली आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे. याच दरम्यान अयोध्येतील जमिनीच्या वाढत्या किमतींबद्दल जाणून घेऊया.

ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाने रामजन्मभूमीच्या बाजूने निर्णय दिला त्याच दिवशी तेथील जमिनींचे भाव गगनाला भिडले असल्याचं म्हटलं जात आहे. आज परिस्थिती अशी आहे की काही वर्षांपूर्वी जी जमीन लाखात होती, आज तिची किंमत कोट्यवधींवर पोहोचली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाचा याबाबत एक रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की 2019 मध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय राम मंदिराच्या बाजूने आला तेव्हा मंदिराच्या आसपासच्या जमिनीचे दर वाढू लागले. किमान 25 ते 30 टक्के वाढ नोंदवली गेली. आगामी काळात अयोध्येत विशेषत: राम मंदिराच्या आसपासच्या परिसरात जमिनीचे दर आणखी वाढणार आहेत.

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पाच वर्षांपूर्वी अयोध्येत ज्या दराने जमीन उपलब्ध होत होती, त्यात आज पाच ते दहा पटीने वाढ होत आहे. म्हणजे पाच वर्षांपूर्वी एखाद्या जमिनीची किंमत 35 लाख रुपये होती, तर आज त्या जमिनीची किंमत 3 कोटींहून अधिक झाली आहे.

अयोध्येत जमिनीचे दर झपाट्याने वाढत आहेत. विशेषतः मंदिराच्या आजूबाजूच्या जमिनी महाग होत आहेत. सध्या अयोध्येत मंदिरासह इतर अनेक विकासकामे सुरू आहेत. एक मोठे पर्यटन स्थळ म्हणून सरकार या शहराकडे पाहत आहे. अयोध्येत राहणाऱ्या आणि प्रॉपर्टीचे काम करणाऱ्या आदित्य सिंह यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितलं की, मंदिरापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर रिकामी जागा शोधणे खूप कठीण आहे. मंदिराच्या अगदी जवळ कोणतीही जमीन आढळल्यास त्याचा दर प्रति चौरस फूट 20 हजार ते 25 हजार प्रति चौरस फूट आहे.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या