शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

कलम ३७० रद्द झाल्यानंतर किती जणांनी जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली? गृह मंत्रालयानं लोकसभेत दिली सविस्तर माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 14:14 IST

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर या प्रदेशात खरंच काश्मीर बाहेरील लोकांना जमीन खरेदी करता आली आहे का? याचं उत्तर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लोकसभेत देण्यात आलं आहे.

नवी दिल्ली-

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर या प्रदेशात खरंच काश्मीर बाहेरील लोकांना जमीन खरेदी करता आली आहे का? याचं उत्तर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लोकसभेत देण्यात आलं आहे. कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत काश्मीरबाहेरील एकूण ३४ जणांनी या केंद्रशासित प्रदेशात जमीन खरेदी केल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून लोकसभेत देण्यात आली आहे. या संपत्ती जम्मू, रियासी, उधमपूर आणि केंद्र शासित प्रदेशातील गांदरबल जिल्ह्यातील आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ए लागू असताना या प्रदेशात इतर राज्यातील रहिवासी व्यक्तीला जमीन खरेदी करण्याची परवानही नव्हती. पण जेव्हापासून जम्मू-काश्मीरला केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषीत करण्यात आलं आणि कलम ३७० हटवण्यात आलं तेव्हापासून या प्रदेशात कोणताही व्यक्ती जमीन खरेदी करण्यास मुक्त झाला. 

केंद्र सरकारनं ५ ऑगस्ट २०१९ मध्ये महत्वाचा निर्णय घेत जम्मू-काश्मीर आणि लडाखला वेगवेगळं केंद्र शासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आलं. कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार प्राप्त झाले होते. याअंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये स्वतंत्र ध्वज आणि संविधान लागू होतं. संरक्षण, परदेश आणि संचार विषय वगळता इतर सर्व कायदे बनवण्यासाठी राज्याची परवानगी आवश्यक होती. इतकंच नव्हे तर जम्मू-काश्मीरच्या नागरिकांकडे दुहेरी नागरिकत्व होतं. इतर राज्यातील लोक जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकत नव्हते. 

सौदीच्या तीन कंपन्यांची मोठी गुंतवणूकउद्योग व वाणिज्य विभाग आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे मुख्यसचिव रंजन प्रकाश ठाकूर यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये वातावरण बदलत आहे. सौदी अरेबियातील तीन कंपन्या याठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहेत. यात एमआर ग्रूप जम्मूच्या प्रदर्शनी मैदान आणि श्रीनगर येथील बादामीबाग येथे दोन मल्टीपर्पज आयटी टॉवर उभारणार आहे. यात सर्व प्रकारच्या कंपन्या असणार आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCentral Governmentकेंद्र सरकारHome Ministryगृह मंत्रालय