शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

"आठ वर्षांत भाजपने किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन केले?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 09:40 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा रोखठोक सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून भाजप व आम आदमी पार्टीदरम्यान चांगलीच जुंपली असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप काश्मिरी पंडितांच्या पलायनावरून राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे. आठ वर्षांत भाजपने किती काश्मिरी पंडितांचे जम्मू-काश्मीरमध्ये पुनर्वसन केले, असा रोखठोक सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला. 

द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट यूट्यूबवर टाकावा आणि या चित्रपटाने आतापर्यंत केलेली कमाई काश्मीर पंडितांच्या कल्याणासाठी खर्च करावी, अशी सूचनाही केजरीवाल यांनी पुन्हा केली आहे. चित्रपटावरील त्यांची टिप्पणी आणि भाजपाच्या टीकेसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, गेल्या २५ वर्षांत कश्मिरी पंडितांनी केलेल्या पलायनानंतर केंद्रात गेल्या आठ वर्षांसह १३ वर्षे भाजपाचे सरकार होते. या अवधीत किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करण्यात आले? काश्मिरी पंडितांचे एक तरी कुटुंब काश्मीरला परतले का? काश्मीर पंडितांच्या घर वापसीसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.

अनुपम खेर यांचा पलटवार‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटासंबंधी अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या टिप्पणीवर अभिनेता अनुपम खेर भडकले आहेत. काश्मिरी पंडितांच्या शोकांतिकेवर केजरीवाल विधानसभेत बोलताना विनोदी कलाकाराचे काम करण्याचा प्रयत्न करत होते, अशी टीका अनुपम खेर यांनी केली आहे.खेर पुढे म्हणाले की, केजरीवाल यांना भाजप किंवा पंतप्रधानांना बोलायचे असल्यास त्यांनी थेट त्यांच्याशी बोलले पाहिजे होते. नाहक आमच्या चित्रपटाला मध्ये आणत हा प्रचाराच्या धाटणीचा चित्रपट असल्याचे म्हणणे लाजीरवाणे आहे. केजरीवाल यांनी चित्रपट पाहिलेला नाही. विधानसभेत ते विनोदी कलाकाराचे काम करण्याचा प्रयत्न करत होते. केजरीवालांना घरे-दारे सोडून परागंदा झालेल्या लाखो काश्मिरी हिंदूंबद्दल  काही वाटत नाही. प्रत्येक भारतीयाने सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघावा आणि केजरीवाल यांच्या असंवदेनशीलपणाला सडेतोड उत्तर द्यावे, हीच माझी केजरीवाल यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया होय.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्स