शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे मूल किती वेळ मोबाइल पाहते? अतिवापराचे परिणाम थेट शरीर अन् मनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 06:25 IST

जवळपास २४ टक्के मुले झोपण्यापूर्वा मोबाइल पाहत असल्याचे निदर्शनास आले. केंद्र सरकारनेच ही माहिती संसदेत दिली आहे.

मुलांच्या हातात मोबाइल ही आता ‘घर घर की कहानी’ झाली आहे. शाळेतून आले की मोबाइल, खेळून आले की मोबाइल, झोपण्यापूर्वी मोबाइल अशा मोबाइल पाहण्याच्या मुलांच्या वेळा ठरलेल्या असतात. याचाच अभ्यास नुकताच करण्यात आला. त्यात जवळपास २४ टक्के मुले झोपण्यापूर्वा मोबाइल पाहत असल्याचे निदर्शनास आले. केंद्र सरकारनेच ही माहिती संसदेत दिली आहे.कोणी केला अभ्यास?मुलांच्या मोबाइल सवयीविषयी ‘नॅशनल कमीशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स’ या संस्थेने अभ्यास केला.इंटरनेटजोडणी असलेल्या स्मार्टफोनची हाताळणी आणि त्याचा मुलांवर होणारा शारीरिक, मानसिक आणि वर्तनात्मक परिणाम, हा या अभ्यासाचा विषय होता.अभ्यासातून निघालेले निष्कर्षमुले झोपण्यापूर्वी मोबाइल पाहतात, असे या अभ्यासात निदर्शनास आले.३७% मुलांची एकाग्रतेची पातळी सातत्याने मोबाइल स्क्रीनकडे पाहिल्याने घसरली.माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती संसदेत दिली.मुलांवर होणारे परिणामसतत मोबाइल पाहिल्याने मुलांच्या दृष्टीवर परिणाम होतो.त्यामुळे डोळ्यांतून सारखे पाणी गळणे, दृष्टिदोष निर्माण होणे, चष्मा लागणे इत्यादी प्रकार घडतातएकाग्रता भंग होण्याचे प्रमाणही आताच्या मुलांमध्ये वाढले आहे. त्यास मोबाइल कारणीभूत आहे.पालकांनी मुलांना ठरावीक काळासाठीच मोबाइल हातात द्यावा. इतरवेळी त्यांचे लक्ष मैदानी खेळाकडे वळवावे, असा वैद्यकीय तज्ज्ञ सल्ला देतात.