शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"मशिदीत 'जय श्रीराम' घोषणा देणं अपराध कसा?" सर्वोच्च न्यायालयाचा कर्नाटक सरकारला सवाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:10 IST

हे प्रकरण दक्षिण कन्नड जिल्ह्यातील आहे. येथे दोन लोकांनी मशिदीत शिरून 'जय श्रीराम' घोषणा दिल्या होत्या.

मशिदीमध्ये 'जय श्री राम' घोषणा दिल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्याच्या आरोपावरून दाखल केलेला खटला रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेकर्नाटक सरकारला उत्तर मागितले आहे. मात्र, या प्रकरणात सरकारला नोटीस जारी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

हे प्रकरण दक्षिण कन्नड जिल्ह्यातील आहे. येथे दोन लोकांनी मशिदीत शिरून 'जय श्रीराम' घोषणा दिल्या होत्या. यानंतर, हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले होते. तेव्हा न्यायालयाने हे प्रकरण रद्द केले होते. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल -सुनावणीवेळी सर्वोच्च न्ययालयाने प्रश्न केला की, हा गुन्हा कसा होऊ शकतो? न्यायालयाच्या प्रश्नावर उत्तर देताना याचिकाकर्त्याचे वकील म्हणाले, "जर एका समाजाच्या धार्मिक स्थळावर, दुसऱ्या समाजाच्या घोषणा देण्याची परवानगी दिली गेली, तर सांप्रदायिक वाद निर्माण होऊ शकतो. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हैदर अली नावाच्या व्यक्तीच्या याचिकेवर कर्नाटक सरकारला उत्तर मागितले आहे.

कर्नाटक सरकारला मागितलं उत्तर -उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाख याचिकेव कर्नाटक सरकारकडून उत्तर मागवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने, या प्रकरणात मशिदीमध्ये घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधातील गुन्हेगारी कार्यवाही या आधारावर रद्द केली होती की, यामुळे कसल्याही प्रकराच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नाहीत.  

आपल्या निर्णयात उच्च न्यायालयाने म्हटले होते की, "कुणाच्या 'जय श्रीराम' म्हटल्याने, कुण्या वर्गाच्या धार्मिक भावना कशाकाय दुखावल्या जाऊ शकतात, हे समजण्या पलिकडचे आहे." 

टॅग्स :Karnatakकर्नाटकSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालयMosqueमशिद