शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

व्हिसासाठी आलेले फसवे इ-मेल आणि फोन कसे ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 11:51 IST

व्हिसाची प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी किंवा गतीमान करण्यासाठी पैसे द्या असा इ-मेल किंवा फोन आल्यास काय करावे?

प्रश्न- मला अमेरिकेतील एका कंपनीमधून नोकरीसाठी इ-मेल आला आहे. मी त्यांना व्हिसा प्रक्रीयेसाठी फी म्हणून मोठी रक्कम दिल्यास ते नोकरी द्यायला तयार आहेत. हा प्रकार सामान्य आहे का?उत्तर- आजिबात नाही. हा तर घोटाळाच असण्याची शक्यता जास्त आहे. दुर्दैवाने अशाप्रकारचे फसवे इमेल सामान्य झाले आहेत.  अशा खोट्या वाटणाऱ्या इ-मेलपासून दूर राहाणे अत्यंत आवश्यक आहे.याप्रकारच्या घोटाळ्यांना कोणीही बळी पडू नये असे आम्हाला वाटते. सुदैवाने अशा फसव्या इमेल ओळखण्यासाठी काही साधे नियम मदत करू शकतात.पहिला नियम म्हणजे, प्रथमच व्हिसा अर्ज करणाऱ्या सर्वांनाच कौन्सुलर अधिकाऱ्यांसमोर मुलाखत दिल्यानंतरच व्हिसा मिळतो. जर इ-मेलमध्ये यापेक्षा वेगळा दावा करण्यात आला असेल तर तो घोटाळा असण्याची शक्यता आहे.दुसरे म्हणजे मुलाखतीपूर्वी अमेरिकत दुतावास किंवा वाणिज्यदुतावास यांपैकी कोणताही अधिकारी आपल्याला व्हिसा मिळेल याची खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना तुम्ही लगेच ओळखू शकाल.अमेरिकन व्हिसासाठी सर्व प्रकारची फी अमेरिकन सरकारकडून निश्चित केलेली असते. त्यापेक्षा कोणतीही वेगळी रक्कम व्हिसा लवकर मिळवण्यासाठी किंवा खात्रीने मिळावा यासाठी घेतली जात नाही. सध्या तुम्हाला व्हिसासाठी आवश्यक असणाऱ्या फीबद्दल व पैसे भरण्याच्या मार्गांबद्दल माहिती मिळवण्यासाठी http://www.ustraveldocs.com/in/ येथे भेट द्या.

हेच तिन्ही नियम फोन कॉल्ससाठीही लागू होतात. जर अमेरिकन दुतावास किंवा वाणिज्यदुतावासातील कर्मचारी असल्याचे भासवून कोणीही तुम्हाला व्हीसा प्रक्रीया गतिमान करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी पैसे मागणारा फोन केल्यास त्या व्यक्तीला पैसे देऊ नका.जर कोणत्याही कागदोपत्री व्यवहारांमध्ये संशय आला तर तुम्ही स्थानिक पोलिसांशी संपर्क करून तक्रा दाखल करावी असे आम्ही सुचवतो. त्यानंतर अमेरिकन वाणिज्यदुतावासाला प्राथमिक माहिती अहवालाची (एफआयआर) एक प्रत mumbai_visa_fraud@state.gov. 

टॅग्स :USअमेरिकाVisaव्हिसा