शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळी 5 नंतर मतदानाची टक्केवारी कशी वाढते? निवडणूक आयुक्तांनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:42 IST

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे.

Election Commission of India : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. पण, ही तारीख जाहीर करण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आयोगावर उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली. तसेच, ईव्हीएम हॅक केल्याचे आरोप फेटाळून लावले, सायंकाळी 5 वाजेनंतर मतदानाचा टक्का कसा वाढला? याची माहितीही दिली.

पत्रकारांशी संवाद साधताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, आजकाल प्रत्येक निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मतदारांमध्ये मिस मॅच झाले, मतमोजणी मंदावली, ईव्हीएम हॅक केले...अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात. सायंकाळी 5 नंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचा आरोपही केला जातोय. पण, मतदानाची टक्केवारी कुठे वाढली, याची आम्हालाही माहिती द्या, आम्ही त्याची चौकशी करू. 

फॉर्म 17 सी चा अभ्यास करण्यासाठी वेळ लागतोपोलिंग एजंट सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदान केंद्रातच असतात. ते मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतात. सर्व काही त्यांच्या समोर घडते. मतदान संपण्यापूर्वी, मतदान केंद्र सोडण्यापूर्वी फॉर्म 17 सी भरला जातो, ज्यामध्ये मतांची संख्या नोंदवली जाते. सेक्टर मॅजिस्ट्रेट दिवसभरात वेगवेगळ्या वेळी मतदान केंद्राला भेट देतात आणि मतदानाची नोंद घेतात ट्रेंड समजून घेण्याचा प्रयत्न करतात.

जगात कुठेही मतदान संपल्यानंतर 6 वाजता लगेचच मतदानाची टक्केवारी दिली जात नाही. 5 वाजल्यानंतर पीठासीन अधिकारी मतदारांना ठिकठिकाणी टोकन देतात. मग शेवटचे मतदान झाल्यानंतर ते पॅक केले जाते. फॉर्म 17 सी भरला जातो. त्याची संख्या लाखात आहे. या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर अंतिम आकडा जारी केला जातो, अशी महत्वाची माहिती राजीव कुमार यांनी यावेळी दिली. 

हेच लोकशाहीचे सौंदर्य2020 पासून एकूण 30 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. 15 राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आले. हेच मूळात लोकशाहीचे सौंदर्य आहे. निष्पक्ष निवडणुकांचे हेच लक्षण आहेत. यावरून मतदार किती हुशार आहेत, हे स्पष्ट होते. मतदानाच्या सुरुवातीपासून निकाल लागेपर्यंत संपूर्ण पारदर्शकता राखली जाते, असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगdelhiदिल्लीElectionनिवडणूक 2024