शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ATM कार्डधारकांचे पैसे कसे कापले जातात?.... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 14:44 IST

देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना कशा प्रकारे चुना लावते, याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली- देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना कशा प्रकारे चुना लावते, याची माहिती समोर आली आहे. देशभरात एसबीआयचे 43 हजारांहून अधिक एटीएम आहेत. तसेच आजकाल जास्त करून लोक पैसे काढण्यासाठी थेट बँकेत न जाता एटीएमचा वापर करतात. ब-याचदा मिनी स्टेटमेंटही एटीएम मशिनमधून घेतलं जातं. डेबिट कार्डांवरील व्यवहारांसाठी छोट्या व्यावसायिकांना आकारण्यात येणा-या शुल्कावर रिझर्व्ह बँकेने मर्यादा घातल्या होत्या. या शुल्काची वाटणी कशी करायची यावरून बँका आणि पेमेंट कंपन्या यांच्यात वाद सुरू आहे. या शुल्कास मर्चंट डिस्काऊंट रेट (एमडीआर) असे म्हटले जाते. व्यावसायिकांकडून ते वसूल केले जाते. व्हिसा, मास्टरकार्ड आणि रु-पे यासारखी कार्डे देणा-या बँका आणि व्यावसायिकांना स्वाइप मशिनसारखे ‘पॉइंट ऑफ सेल टर्मिनल’ उभे करून देणा-या पेमेंट कंपन्या यांच्यामार्फत हे व्यवहार होतात. परंतु एसबीआय ग्राहकांकडून एटीएमच्या माध्यमातून अनेक चार्जेस वसूल करतं.एसबीआयकडून कसा लावला जातो ग्राहकांना चुना ?- एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड डेबिट कार्डसाठी 100 रुपये वसूल केले जातात. त्याशिवाय प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी सेवाकराबरोबर 306 रुपये शुल्क आकारले जाते.   - जिथे क्लासिक डेबिट कार्डवर 100 रुपये सेवाकर वसूल केला जातो. दुसरीकडे सिल्व्हर, गोल्ड डेबिट कार्डासाठी 150 रुपये अधिक सेवाकर वसूल केला जातो. प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी 200 रुपये आणि सेवाकर लागतो. प्राइड, प्रीमियम बिझनेस डेबिट कार्डसाठी 300 रुपये अधिक सेवाकर वसूल केला जातो. - डेबिट कार्डसाठी 204 रुपयांसह अधिक पैसे वसूल केले जातात. बँक 51 रुपये सेवाकर वसूल करते. - एटीएमच्या माध्यमातून महिन्याचे 5 ट्रान्झॅक्शन मोफत आहेत. परंतु त्यानंतरच्या व्यवहारावर 17 रुपये सेवाकर वसूल केला जातो. तसेच गैर वित्तीय व्यवहारावर 6 रुपये अधिकचं शुल्कही आकारलं जातं - एटीएमच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार केल्यास सेवाकरासहीत 169 रुपयांएवढं शुल्कही वसूल केलं जाते. - तुमच्या बँकेत पर्याप्त रक्कम नसेल आणि तुम्ही एटीएमच्या माध्यमातून व्यवहार केल्यास तुम्हाला 17 रुपये सेवाकरासह मोजावे लागतात. 

तुम्ही SBI बँकेचे ग्राहक आहात?, मग तुमचे डेबिट कार्ड बंद होणारदेशातील मोठी अन् महत्वाची बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी डेबिट कार्ड बदलण्याची सूचना केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुचनेनुसार हा बदल करण्यात येत असल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. एसबीआयकडून कनवर्जन प्रोसेस करण्यात येत असून यासाठी ग्राहकाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही. तसेच ही प्रकिया पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही एसबीआयने म्हटले आहे. ज्या ग्राहकांकडे मॅग्नेटिक डेबिट कार्ड आहे, त्या ग्राहकांना ईएमव्ही चीप डेबिट कार्डद्वारे 31 डिसेंबर पर्यंत आपले डेबिट कार्ड बदलावे लागणार आहे. जर, ग्राहकाने 31 डिसेंबरपर्यंत तुमचे डेबिट कार्ड न बदलल्यास, त्यानंतर जुन्या डेबिट कार्डने एकही व्यवहार करता येणार नसल्याचेही एसबीआयकडून सांगण्यात आले आहे. कोणाला ट्रीट देत असाल, तर जर जपून; क्रेडिट आणि डेबिट कार्ड क्लोनिंग करणारी टोळी गजाआड

 

टॅग्स :atmएटीएम