शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोव्हॅक्सिनची किंमत १२०० पर्यंत कशी वाढली?; विरोधकांचा केंद्र सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 06:34 IST

कोव्हॅक्सिनची किंमत पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी असेल असे विधानही लस बनविणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीचे मुख्य संचालक एल्ला कृष्णा यांनी नुकतेच केले होते.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : कोव्हॅक्सिन लसीची किंमत १२०० रुपयांपर्यंत कशी वाढली असा सवाल विरोधी पक्षांनी मोदी सरकारला केला आहे. कोव्हॅक्सिनची किंमत पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी असेल असे विधानही लस बनविणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीचे मुख्य संचालक एल्ला कृष्णा यांनी नुकतेच केले होते. त्याचाच आधार घेत विरोधकांनी आता सरकारवर निशाणा साधला आहे.भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन ही लस बनविली आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मोदी सरकारला सवाल केला आहे की, पाण्याच्या बाटलीपेक्षाही कोव्हॅक्सिन लसीचा उत्पादन खर्च कमी असेल तर मग ही लस राज्यांना ४०० रुपयांना व खासगी रुग्णालयांना १२०० रुपयांना व केंद्र सरकारला फक्त १५० रुपयांना का विकली जात आहे. कोव्हॅक्सिनची किंमत कोणत्या निकषांवर ठरविण्यात आली हे मोदी सरकारने जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह अन्य विरोधी पक्षांनी केली आहे. कोव्हॅक्सिनच्या किमतीबाबत मोदी सरकारने पारदर्शक धोरण स्वीकारले पाहिजे.मोदी सरकारला किती हिस्सा मिळाला?काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कोव्हॅक्सिनची किंमत ठरविताना त्यात मोदी सरकारला किती हिस्सा मिळाला आहे हे जनतेला कळले पाहिजे. कोव्हॅक्सिनच्या किमतीची तुलना पाण्याच्या बाटलीच्या किमतीबरोबर केली जात आहे. 

मात्र, बाटलीची किंमत रुपयांमध्ये की पौंडामध्ये आकारण्यात आली, हे स्पष्ट झाले पाहिजे. ज्या देशात बेकारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे, महागाईने लोकांचे कंबरडे मोडले आहे, तिथे कोव्हॅक्सिनचे दोन डोस विकत घेणे अनेक लोकांच्या खिशाला परवडणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस