शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

अमृतपाल सिंग पोलिसांच्या हातातून निसटलाच कसा? हायकोर्टाने पंजाब सरकारला तीव्र शब्दात फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 06:31 IST

अमृतपाल सिंगला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी मनप्रीतसिंग ऊर्फ मन्ना, गुरदीपसिंग ऊर्फ दीपा, हरप्रीतसिंग ऊर्फ हॅप्पी आणि गुरभेज सिंग ऊर्फ भेजा या चौघांना अटक केली आहे.

चंडीगड : खलिस्तानसमर्थक अमृतपाल सिंगला पकडण्यात अपयश आल्यानंतर गुप्तचर विभागाच्या कामावर नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयानेपंजाब सरकारवर ताशेरे ओढले. न्या. शेखावत यांनी पंजाबचे महाधिवक्ता विनोद घई यांना विचारले की, तुमच्याकडे ८० हजार पाेलिस असताना आणि संपूर्ण ऑपरेशन बारकाईने आखले गेले असताना अमृतपाल सिंग हातातून कसा सुटला? 

पंजाब सरकारने मंगळवारी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाला सांगितले की, अमृतपाल सिंगविरोधात रासुकाच्या  तरतुदी लागू केल्या आहेत. न्यायालयात ॲडव्होकेट इमाम सिंह खारा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. खारा हे अमृतपाल सिंग आणि त्याच्या ‘वारीस पंजाब दे’ संस्थेचे कायदेशीर सल्लागार आहेत. अमृतपाल सिंगला पोलिसांच्या कथित कोठडीतून मुक्त करण्याची विनंती  यात केली आहे. 

पळून जाण्यात मदत करणारे जेरबंद; अमृतपालची छायाचित्रे पाेलिसांकडून जारी अमृतपाल सिंगला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी मनप्रीतसिंग ऊर्फ मन्ना, गुरदीपसिंग ऊर्फ दीपा, हरप्रीतसिंग ऊर्फ हॅप्पी आणि गुरभेज सिंग ऊर्फ भेजा या चौघांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान असेही समजले आहे की, तो जालंधर येथील नंगल अंबियन गावातील गुरुद्वारात गेला होता.  तिथे त्याने कपडे बदलले. शर्ट आणि पँट परिधान केली आणि इतर तिघांसह दोन दुचाकींवर ते पळाले. एक कार जप्त करण्यात आली असून, त्यात रायफल, काही तलवारी आणि एक वॉकीटॉकी सेट मिळाला आहे. पोलिसांनी अमृतपालची वेगवेगळ्या पोशाखांतील ४ छायाचित्रेही प्रसिद्ध केली आणि लोकांना त्याचा शोध घेण्यास मदत करण्याचे आवाहन केले.

सुरक्षेच्या कारणास्तव संयम बाळगला पंजाबचे महाधिवक्ता म्हणाले की, पोलिसांनी सुरक्षेसाठी संयम बाळगला; कारण ही कारवाई लोकवस्तीच्या भागात होती. घई म्हणाले की, काही बाबी संवेदनशील आहेत की, त्या खुल्या न्यायालयात स्पष्ट करता येत नाहीत. अमृतपाल सिंगचे वडील तरसेम सिंग हेही कोर्टरूममध्ये पोहोचले. त्यावर कोर्टाने सांगितले की, ते यात पक्षकार नसल्याने त्यांचा युक्तिवाद ऐकून घेता येणार नाही.शनिवारपासून धरपकड‘वारीस पंजाब दे’च्या सदस्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. अमृतपाल सिंग पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांचे म्हणणे आहे की, अमृतपाल हा त्यांनी लावलेल्या सापळ्यातून सुटल्यानंतर फरार झाला. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPunjabपंजाब