शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोविशिल्ड: अशी असेल लसीकरण मोहीम? नोंदणी कशी कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 05:11 IST

Corona Vaccination : कोविशिल्ड लस पुढील सहा ते आठ महिन्यांत ३० कोटी लोकांना देण्यात येणार आहे. एकूणच लसीकरणाची ही मोहीम कशी चालणार, कोणाला लस प्रथम मिळणार वगैरे प्रश्न निर्माण होत आहेत.

कोविशिल्ड लस पुढील सहा ते आठ महिन्यांत ३० कोटी लोकांना देण्यात येणार आहे. एकूणच लसीकरणाची ही मोहीम कशी चालणार, कोणाला लस प्रथम मिळणार वगैरे प्रश्न निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेचा घेतलेला आढावा...

लस प्रथम कोणाला मिळणार?

आरोग्य कर्मचारीn सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुमारे १ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईलn कोरोना लसीकरणावरील राष्ट्रीय तज्ज्ञ समितीने (एनईजीव्हीएसी) ही शिफारस केली आहे.  या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे विविध गटांत विभाजन करण्यात येणार आहेn आरोग्य कर्मचारी, एकात्मिक बाल विकास सेवा कर्मचारी, परिचारिका आणि पर्यवेक्षक, वैद्यकीय अधिकारी, निमवैद्यकीय कर्मचारी, सपोर्ट स्टाफ आणि विद्यार्थीn या सर्वांशी संबंधित डेटा सरकारी आणि खासगी आरोग्य यंत्रणांकडून प्राप्त करण्यात आला आहे आणि कोविन ॲपमध्ये हा डेटा फीड करण्याचे काम सुरू आहेn कोविन हे ॲप लसीकरण मोहिमेसाठी विकसित करण्यात आले आहे

पालिका कर्मचारीn  कोरोनाकाळात सर्वेक्षण, टेहळणी आणि नियंत्रण या प्रक्रियांशी संबंधित सर्व यंत्रणांच्या सुमारे दोन कोटी कर्मचाऱ्यांना पुढील टप्प्यात लस देण्यात येईलn त्यात केंद्र आणि राज्य सरकारांमधील पोलीस खाते, सशस्त्र दले, गृहरक्षक, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षण संस्था, तुरुंग प्रशासन, पालिका कर्मचारी आणि महसूल कर्मचारी इत्यादींचा समावेश असेलn या टप्प्यात राज्य सरकारी कर्मचारी तसेच संरक्षण, गृह, गृहनिर्माण आणि नगर विकास या मंत्रालयांच्या कर्मचाऱ्यांनाही लस दिली जाईल

५० वर्ष वयावरील व्यक्तीn या गटात दोन उपगट करण्यात येतील. n पहिल्या गटात ६० वर्षांवरील तर दुसऱ्या गटात ५० ते ६० वयोगटातील लोकांचा समावेशn या वयोगटांतील लोकांची संख्या ठरविण्यासाठी अलीकडेच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या मतदारयाद्यांचा संदर्भ घेतला जाईलn कोरोनासंसर्गाचे प्रमाण अधिक असलेले क्षेत्र.  ज्या भागात कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक होते त्या भागाला लसीकरणात प्राधान्य दिले जाईलn अशा प्रकारच्या भागांची निश्चिती करण्याचे स्वातंत्र्य राज्य सरकारांकडे असेल

 उर्वरित लोकसंख्याn वरील सर्व प्रकारच्या लोकांचे सीकरण झाल्यानंतर उर्वरित लोकांना लस दिली जाईलn किती लोकांना लस द्यायची हे संसर्गाचे प्रमाण व लसीची उपलब्धता यावर अवलंबून असेलn लसीकरण केंद्रात गर्दीचा अतिरेक टाळण्यासाठी नियोजनबद्ध रीतीने लाभार्थ्यांना लस दिली जाईल

नोंदणी कशी कराल?लसीकरणाच्या नंतरच्या टप्प्यात स्वनोंदणी प्रारूप उपलब्ध करून दिले जाईल. कोविन वेबसाइटवर जाऊन नोंदणी करता येईल.  सरकारप्रमाणित ओळखपत्र असेल तर ते वेबसाइटवर अपलोड करा. अथवा आधार ऑथेंटिकेशन करा. बायोमेट्रिक्स, ओटीपी किंवा डेमोग्राफिक पद्धतीने ऑथेंटिकेशन होईल. नोंदणी झाल्यानंतर लसीकरणासाठी तारीख आणि वेळ दिली जाईल.केवळ पूर्वनोंदणी केलेल्यांनाच लस दिली जाईल. कोविन वेबसाइटवरील सत्रव्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल. लाभार्थ्याला कोणत्या सत्रात आणि कोणत्या स्थळी लस मिळेल, हे जिल्हा प्रशासन ठरवेल. कोविनमध्ये इनबिल्ट मॉनिटरिंग आणि रिपोर्टिंग यंत्रणा असेल

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या