शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित महिलांनी परपुरुषाबरोबर संबंध ठेवल्यास पुरुषच दोषी कसा ? – सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 23:48 IST

सर्वोच्च न्यायालयानं आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विवाहित महिलेनं विवाहित पुरुषाशी संबंध ठेवल्यास फक्त पुरुषालाच दोषी धरता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विवाहित महिलेनं विवाहित पुरुषाशी संबंध ठेवल्यास फक्त पुरुषालाच दोषी धरता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. विवाहबाह्य संबंधावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.

विवाहबाह्य संबंधाला दोन्ही पक्ष पुरुष आणि स्त्री हे दोघेही सारखेच जबाबदार आहेत. विवाहित महिला परपुरुषाबरोबर संबंध प्रस्थापित करत असल्यास पुरुषालाच का दोष दिला जातो, असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी उपस्थित केला आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम 497ला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला होता.जर विवाहित महिला पतीच्या परवानगीनं परपुरुषासोबत संबंध ठेवत असल्यास तो गुन्हा नाही. या त्रिसदस्यीय खंडपीठात न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांचाही समावेश आहे. त्यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. परपुरुषाने विवाहित महिलेबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवल्यास त्या महिलेचा पती परपुरुषावर कलम 497नुसार गुन्हा नोंदवू शकतो. भादंवि कलम 497नुसार या ‘गुन्ह्या’साठी त्या परपुरुषाला पाच वर्षांची शिक्षाही दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे कायद्यात त्या परपुरुषाबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करणा-या विवाहीत महिलेला गुन्हेगार ठरवलं जात नाही. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय