शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

मनोहर पर्रिकरांनी सुचवलेली लष्करी कपात कितपत योग्य

By admin | Updated: March 6, 2016 16:46 IST

योग्य काटकसर करून, काही सामग्री वाचवता आली, ती अत्याधुनिक शस्त्रास्त्रे वाढवण्यासाठी वापरावी, असा योग्य सल्ला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिला.

संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी, जी आवश्यक संख्या मिलिटरी करता हवी, त्यावर खोल विचार, विश्लेषण करून, जर त्यात योग्य काटकसर करून, काही सामग्री वाचवता आली, ती अत्याधुनिक शस्त्रास्त्रे वाढवण्यासाठी वापरावी, असा योग्य सल्ला दिला.
 
लष्करी मनुष्यबळ आणि लष्करी साहित्याचा आढावा 
ही प्रक्रिया, पायदळात सतत चालू असते, आणि माझी खात्री आहे की वायु आणि नौसेना ही, या बाबतीत अत्यंत चाणाक्ष आहे. जर कुठे अनावश्यक ‘Flab’ आहे तो गृह मंत्रालय खाली जे नाना प्रकार चे आयपीएस, सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीएफ, सीआयएसएफ, एसआरपीएफ सशस्त्र सैन्य उभे केले आहेत, तिथे वाटेल तेवढा मिळेल, जो कधी चोरल्या म्ह्श्या शोधत असतो, नाहीतर नेत्यांची ‘जी हजुरी’ करत असतो. जेव्हा लहान मूल ‘ openTube well’ मध्ये पडते तेव्हा आर्मी, भूकंप येतो तेव्हां मिलिटरी, त्सुनामी येते तेव्हां मिलिटरी, दंगे होतात तेव्हां मिलिटरी, पूर, महापूर येतो तेव्हां मिलिटरी पण मोठ्ठी पदे, पगार एका मंत्रीची मर्जी मिळवून ह्यांचे (BSF, ITBF, CISF, SRPF) वाट्टेल तशे वाढवले जातात!? इथे कुणाचे लक्ष आहे का?
 3.माझ्या ३६ वर्षाच्या  आर्मीच्या नोकरीत, मी तीन वर्ष १९९८-२००१, चेयरमन, ईटीआरएस  (Equipment Tables Review Committee), (Weapons & Equipment Directorate)  होतो. तशीच एक लष्कराची ASEC कमिटी असते. या दोन्हींच्या कार्याबद्दल मला आपणाला थोडक्यात सांगायचे आहे. 
एएसईसी कमिटी प्रत्येक विशिष्ट युनिट, पायदळ बटालियन, टेंक रेजिमेंट, तोपखाना रेजिमेंट, सिविल यांत्रिक रेजिमेंट, विद्युत एवं यांत्रिक रेजिमेंट, सिग्नल रेजिमेंट, म्हणजे प्रत्येक विशिष्ट युनिटच्या करता, त्यांचे कार्य यशस्वी प्रमाणे करण्या करता, एक विशिष्ट War Establishment Table (WET) असते.
 
WET चे मुख्य भाग. 
 ऑपरेशनल रोल त्यांच युद्धात कार्य काय आहे ह्याचे वर्णन असते. त्या कार्याचे विश्लेषण आक्रमण, संरक्षण, युद्ध, असल्या सगळ्या संभावना करता त्यांना किती (लढाऊ Tracked गाड्या), (रबरी टायर गाड्या) याचे सविस्तर वर्णन केले जाते. 
 
इथे ४(a), प्रमाणे टेबल मधे ह्या सगळ्या रणगाड्या, रेडार, ट्रेकटर, जीप, ट्रक, लॉरी ह्यांची नोंद असते.
(c) मनुष्यबळ 
इथे, ह्या रोल करता ऑफिसर्स, जे सी ओस, आणि सैनिक यांची सविस्तर कंपनी, प्लाटून, सेक्शन ह्या विभाग प्रमाणे नोंदणी असते. त्यांच्या पिस्तुल, रायफल, स्टेन गन (Personal Weapon) ची पण नोंद असते.
 
(d). या विशेष कामा करता जी माणसे आणि सामग्री मध्ये फेरबदलची गरज असते, त्याची नोंद केली जाते.
 
 5.WE (War Establishment) चे, दर पाच वर्षांनी सूक्ष्म पणे विश्लेषण केले जाते. मला ह्या कामाचा मेजर आणि लेफ्टनंट कर्नल च्या हुद्यावर पाच वर्षाचा (१९८१-८६) अनुभव आहे. प्रत्येक साधन आणि माणसाचा वापर सूक्ष्म रीत्या, कटाक्षाने न्याहाळला जातो. ज्यांची गरज नसते, त्यांना वगळुन टाकण्यात येते. नवीन गोष्टींची गरज पूर्णपणे सिध्द झाल्यानंतर ध्यानात घेऊन जोडण्यात येते. 
 6.ASEC या नव्या मागण्या War Establishment ला Director General Staff Duties तर्फे व्हाईस चेअरमन ऑफ आर्मी स्टाफकडे  पाठवतो. प्रत्येक स्तरावर संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयातील आर्थिक समितीची संमती घेतली जाते, आणि नवीन WE पुढ्च्या पाच वर्ष करता अमलात आणली जाते.
 
 7.Weapons & Equipment Directorate च्यात ETRC, प्रत्येक युनिट करता War Equipment Table (WET), Equipment Table Schedules (ETS), Tables of Tools & Equipment (ToTE), Vehicle Kit List (VKL) आणि CES(Complete Equipment Schedules), ह्यांचा दर पाच वर्षांनी Review होतो. टेंका, गाड्या, ट्रेकटर, रेडार, तोफांच्या बरोबर, त्यांना अत्यंत उत्तम अवस्थेत ठेवण्या करता जी सामग्री, उपकरणे, SMTs(Special Maintenance Tools), Generators (For Battery Charging) & giving power to Radars, Individual & Special Maintenance Tool Kits for Mechanics, Drivers & Operators असल्या सामाना ची नोंदणी असते. जसे आधुनिक उपकरणे येतील, त्यांना नोंदले जाते आणि जुने (Obsolete/ obsolescent) काढले जातात. Procedure, थोड्क्यात जसा ASEC चा आहे, तसाच असतो, पण इथे चेयरमन यांत्रिक/ विद्युत इंजिनियर असतो.
उत्तरार्ध 
 शेवटी, मला वाटते, जर ‘Flab’ कमी करायचा असेल तर संरक्षण मंत्रालयाने पण आपल्या ‘बाबू’ आणि सिविलीयन लोक जें अवाढव्य भरले आहेत आणि नुसती ‘फाइल’ वर-खाली करत असतात तिथे पण लक्ष द्यावे. गृह मंत्रालयाच्या अवाढव्य नाना प्रकारच्या सुरक्षा सेना ज्या पसरल्या आहेत त्यांच्या ‘FLAB’ कढे ही कुणी तरी लक्ष द्यावे, ही विनंती.
ब्रिगेडियर सदानंद महादेव जोशी, व्ही. एस. एम. (निवृत्त)