शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

दुधाच्या जिल्ह्यात गरमागरम लढती, सर्वाधिक एनआरआय असलेल्या खेडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 10:16 IST

सर्वाधिक एनआरआय असलेल्या खेडा, आणंदमध्ये उत्कंठावर्धक सामने

यदु जोशी

आणंद : अनिवासी भारतीयांचा (एनआरआय) हब असलेल्या आणि देशात अमूल दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या आणंद जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचा प्रभाव दिसत नाही. जवळपास थेट लढत आहे ती भाजप आणि काँग्रेसमध्येच. बाजूच्या खेडा जिल्ह्यात अमूलच्या अध्यक्षांचा मुलगा भाजपचा उमेदवार असल्याने या लढतीला गमतीने अमूल कूल नव्हे, तर अमूल हॉट म्हटले जात आहे. 

दर दहा घरांआड एकजण परदेशात असलेली असंख्य गावे अहमदाबाद ते बडोद्यादरम्यान आहेत. खेडा आणि आणंद हे तर त्यासाठी विशेष प्रसिद्ध. एनआरआय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बिग फॅन. ते भाजपचा प्रचार करताना दिसतात. खेडा असो की आनंद ही काँग्रेसची फिक्सड वोट बँक आहे त्यामुळेच भाजपला संघर्ष करावा लागत आहे. अमूल डेअरीचे चेअरमन रामसिंग परमार यांचे पुत्र योगेंद्रसिंग हे ठासरा येथे भाजपचे उमेदवार आहेत. रामसिंग पाच वेळा काँग्रेसचे आमदार होते. त्यांनी २०१७ पूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला, ते लढले, पण पडले. आता योगेंद्रसिंग हे वडिलांच्या पराभवाचा बदला काढण्याच्या जिद्दीने विद्यमान आमदार कांतीभाई पटेल (काँग्रेस) यांच्याशी दोन हात करत आहेत. सोजित्रामध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार व उमेदवार पूनममाधा (परमार) यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष विपुल पटेल यांचे कडवे आव्हान आहे. पटेल दोनवेळा फार कमी मतांनी हरले होते. आणंद विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कांतीभाई परमार यांना लोकांची अधिक पसंती दिसते. भाजपने योगेश पटेल हा नवा चेहरा दिला आहे.

राष्ट्रवादीला विजयाची खात्रीआपल्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तर गुजरातमध्ये अध्यक्ष आहेत जयंत पटेल. ते बॉस्की या टोपणनावाने ओळखले जातात. काँग्रेसने आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला सोडली आहे. गेल्यावेळी दोन्ही पक्ष वेगळे लढले होते. दोघांच्या मतांची यावेळी बेरीज झाली तर बॉस्की नक्कीच जिंकतील, असे बोलले जाते.

दर्गा, मंदिराचा कळस यावरून राजकारणगोधरा जिल्ह्यातील पावागढ हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान. गडावरील या मंदिराला कळस नव्हता. कारण वर दर्गा होता. त्यामुळे मोठा आक्रोश भक्तांमध्ये होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार दर्गा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आला आणि मंदिरदेखील भव्य बनवण्यात आले. हा मुद्दा भाजपने निवडणुकीत केला आहे.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Electionनिवडणूक