शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

Corona Vaccination: स्टार हॉटेलकडून ‘व्हॅक्सिनेशन पॅकेज’ची ऑफर; केंद्राने घेतली गंभीर दखल, कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 11:08 IST

Hotels offering Corona Vaccination Packages: सरकारी कार्यक्रमानुसार कोविड १९ लसीकरण कार्यक्रम हा केवळ सरकारी केंद्र आणि खासगी हॉस्पिटलद्वारे संचालित केंद्रावर, सरकारी कार्यालयातही घेतला जाऊ शकतो.

ठळक मुद्देफाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात येत असलेले लसीकरण नियमांच्या विरोधात आहेहा प्रकार तातडीनं रोखला पाहिजे असं आरोग्य मंत्रालयाने निर्देश दिलेतसरकारी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर योग्यशीर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश

नवी दिल्ली – खासगी हॉस्पिटल आणि हॉटेलकडून देण्यात येणाऱ्या व्हॅक्सिनेशन पॅकेजवर सरकारने लसीकरण मोहिमेचं उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवला आहे. शनिवारी केंद्र सरकारने एक नोटीस जारी करत खासगी हॉस्पिटलच्या मदतीनं काही हॉटेल व्यावसायिकांनी कोविड १९ वॅक्सिनेशन पॅकेज लोकांना उपलब्ध करत आहेत. ते राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन आहे असं म्हटलं आहे.

सरकारी कार्यक्रमानुसार कोविड १९ लसीकरण कार्यक्रम हा केवळ सरकारी केंद्र आणि खासगी हॉस्पिटलद्वारे संचालित केंद्रावर, सरकारी कार्यालयातही घेतला जाऊ शकतो. वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी त्यांच्या घरापासून जवळच्या केंद्रावर लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात येत असलेले लसीकरण नियमांच्या विरोधात आहे. हा प्रकार तातडीनं रोखला पाहिजे असं आरोग्य मंत्रालयाने निर्देश दिलेत.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नोटिसीत म्हटलंय की, सरकारी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर योग्यशीर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हॉटेलकडून व्हॅक्सिनेशन पॅकेज देऊन लोकांना आकर्षित केलं जात आहे हे नियमांचे उल्लंघन करणारे आहे. काही हॉस्पिटलच्या मदतीने हॉटेल्स अशाप्रकारे ऑफर देत आहेत ते दुर्दैवी आहे. राज्य सरकारने अशा लोकांवर कारवाई करावी असे आदेशात म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, अशाप्रकारे ऑफर देणं हे दुर्दैवी आहे. हॉटेलमध्ये लसीकरण अभियान हे नियमांच्याविरुद्ध आहे. अशा हॉटेल मालकांवर कारवाई केली जाणार आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयांने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहून जे कोणी हा प्रकार करत असतील त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून कोविड १९ लसीकरण अभियानातंर्गत जे काही नियम घालून दिले आहेत त्याप्रमाणे अभियान चालवावं असं म्हटलं आहे.

काही लोकांनी कोरोना काळात पैसे कमवण्याचा धंदा सुरू केला आहे.यातच आता व्हॅक्सिनेशन पॅकेजबद्दल हॉटेल्सकडून लोकांना देण्यात येत असलेल्या ऑफर्सची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी हॉटेलकडून देण्यात येत असलेल्या ऑफर्सचे फोटो व्हायरल केले आहेत. त्यामुळे या ऑफर्सवर देशभरातून अनेकांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारhotelहॉटेलhospitalहॉस्पिटल