शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील हॉटेलचे भाडे गगनाला भिडले; 22 जानेवारी रोजी एका रुमचा किराया 1 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 22:01 IST

Hotels in Ayodhya: श्रीराम जन्मभूमी अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू आहे.

Ram Mandir: प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्यात रामललाची प्रतिष्ठापणा 22 जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी प्रशासन अनेक दिवसांपासून जय्यत तयारीला लागले आहे. मंदिर उद्घाटनाच्या दिवशी लाखो भाविक अयोध्येत येणार आहेत. अशातच अयोध्येतील हॉटेलमधील रुम्सचे भाडे (Ayodhya Hotels Room Price) गगनाला भिडले आहे. 

राममंदिराच्या उद्घाटनापूर्वी अयोध्येतील हॉटेल रुमचे बुकिंग 80 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळेय येथील काही हॉटेलचे दर पाच-सात पटीने वाढले आहेत. काही आलिशान हॉटेलमधील रुमचे एका दिवसाचे भाडे एक लाख रुपयांवर गेले आहे. विशेष म्हणजे रुमच्या भाड्यात एवढी मोठी वाढ होऊनही हॉटेल बुकिंग दररोज वाढत आहे.

लाखो भाविक येणारराम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी देशभरातून सुमारे 3 ते 5 लाख लोक अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत अयोध्येतील बहुतांश हॉटेल्स आधीच भरलेली आहेत आणि ज्या हॉटेलमध्ये या तारखांसाठी खोल्या उपलब्ध आहेत, त्यांच्या भाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

हॉटेलच्या खोलीचे भाडे मीडिया रिपोर्ट्सनुसार, 22 जानेवारी रोजी सिग्नेट कलेक्शन हॉटेलमधील खोलीचे भाडे 70,240 रुपयांवर गेले आहे. गेल्या वर्षी जानेवारीत येथील भाडे 16,800 रुपये होते. रामायण हॉटेलमध्येही एका खोलीचे भाडे 40,000 रुपये झाले आहे. जानेवारी 2023 मध्ये येथील भाडे 14,900 रुपये होते. हॉटेल अयोध्या पॅलेसमधील भाडेही 18,000 रुपयांवर गेले आहे. 

हॉटेलचे भाडे एक लाखनुकत्याच उघडलेल्या पार्क इन रॅडिसनमधील सर्वात आलिशान खोलीचे भाडे एक लाख रुपये झाले आहे. रिपोर्टनुसार, रामायण हॉटेलमध्ये 20 ते 23 जानेवारीपर्यंत हॉटेल्स बुक झाले आहे. शिवाय, फेब्रुवारी आणि मार्चमध्येही 80 टक्के बुकिंग झाले आहे. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेशhotelहॉटेलbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक