शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Video - अश्लील गोष्टी दाखवून विनयभंग करायचा; विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकाची केली यथेच्छ धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 17:16 IST

एका मुख्याध्यापकाने शाळेतील हॉस्टेलमध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कर्नाटकमध्ये घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका मुख्याध्यापकाने शाळेतील हॉस्टेलमध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्नाटकच्या श्रीरंगपटना येथील कटेरी सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. या घटनेनंतर मुख्याध्यापकावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. 

मांड्या जिल्ह्यातील पांडवपुरा तालुक्यातील कटेरी गावात असलेल्या शाळेत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप मुख्याध्यापकावर करण्यात आला आहे. हे गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानंतर विद्यार्थिनींनी मिळून मुख्याध्यापकाला लाठ्या-काठ्यांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. मिळालेल्या माहितीनुसार, कटेरी गावातील शाळेत एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली. 

विद्यार्थिनींनी या घटनेनंतर मुख्याध्यापकाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. मुलींनी झाडू आणि काठ्यांनी मुख्याध्यापकाची यथेच्छ धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलींसोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप मुख्याध्यापकावर करण्यात आला आहेत. या गंभीर प्रकरणाबाबत माहिती मिळताच मुख्याध्यापकाला विद्यार्थिनींच्या ग्रुपने चोप दिला.

विद्यार्थिनीने मुख्याध्यापकाने त्याच्या रुममध्ये बोलावलं आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला आहे. या प्रकरणाबाबत कोणालाही सांगितलं, तर त्या विद्यार्थ्यांच्या ट्रान्सफर सर्टिफिकेटमध्ये त्यांची प्रतिमा मलीन करण्यात येईल, अशी धमकी मुख्याध्यापकाने दिली होती. मुख्याध्यापक मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवायचा, असा आरोपही विद्यार्थिनींनी केला आहे. हे गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुख्याध्यापकाला लाठ्या काठ्यांनी मारलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"