शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘आयुष्मान भारत’च्या ५०० कोटींसाठी रुग्णालये कोर्टात; पंजाब सरकारकडून मागितला जाहिरात खर्चाचा तपशील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 09:29 IST

- डॉ. खुशालचंद बाहेती लोकमत न्यूज नेटवर्क  चंडीगड : आयुष्मान भारत योजनेत केलेल्या उपचाराचे बिल न  देणे पंजाब सरकारला महागात ...

- डॉ. खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्क चंडीगड : आयुष्मान भारत योजनेत केलेल्या उपचाराचे बिल न  देणे पंजाब सरकारला महागात पडले. हायकोर्टाने जाहिराती व सरकारी बंगल्यांच्या नूतनीकरणावरील खर्चाचा तपशील मागितला. शिवाय आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेतनही थांबवले. 

आयुष्मान भारत योजनेतील ५०० कोटींहून अधिकची बिले पंजाब सरकारकडे प्रलंबित आहेत. यापैकी केवळ २६ कोटी दिले आहेत. अनेक रुग्णालयांनी बिले मिळण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली. सुनावणीत भारत सरकारचे अतिरिक्त सॅालिसीटर जनरल सत्यपाल जैन यांनी सांगितले की, आयुष्मान भारत योजनेत ६० टक्के रक्कम केंद्र सरकार देते. केंद्राने पंजाबला २०२३-२४ पर्यंत ३५५.४८ कोटी रुपये दिले आहेत. राज्याने यात आपले ४० टक्के टाकून रुग्णालयांना बिल देणे आवश्यक होते. राज्याने स्वतःचा हिस्सा तर  दिला नाहीच; परंतु केंद्राने दिलेल्या रकमेचाही गैरवापर केला आहे. यावर हायकोर्ट म्हणाले की, राज्य सरकारने पडताळणी करून मंजूर केलेले ५०० कोटी रुपयांचे निर्विवाद बिल का दिले नाही, याचे कोणतेही समाधानकारक  स्पष्टीकरण सरकार देऊ शकलेले नाही. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे केंद्राने दिलेली ३५० कोटींहून अधिकची रक्कमदेखील वितरित न करता बेकायदेशीरपणे रोखून ठेवल्याचे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले.

..तर  अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होणार न्यायमूर्ती विनोद भारद्वाज यांनी प्रधान वित्त सचिवांना डिसेंबर २०२१ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान जाहिराती, सरकारी घरांचे नूतनीकरण आदींवर केलेल्या खर्चाचे तपशीलवार प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.

याशिवाय पंजाब राज्यासाठी किंवा इतर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या बचावासाठी सर्वोच्च न्यायालय किंवा दिल्ली हायकोर्टात केलेल्या खर्चाचा तपशीलही मागितला. 

विशिष्ट कारणासाठी मिळालेल्या निधीचा गैरवापर होत आहे काय, याची तपासणी करण्यासाठी ही माहिती मागवली असल्याचे हायकोर्ट म्हणाले. तसेच निधी इतरत्र वळवणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे सूतोवाचही हायकोर्टाने केले.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारत