उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका ६० वर्षीय महिलेने आपल्या ६५ वर्षीय पतीला घरात कोंडून जिवंत जाळले. पती घरात गाढ झोपेत असताना पत्नीने घराला आग लावली आणि बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून पळ काढला. या भीषण घटनेत पतीचा होरपळून मृत्यू झाला आहे.
ही घटना महाराजगंजच्या श्यामदेवरा पोलीस स्टेशन हद्दीतील बसपर कोठी टोला पिपरा गावात घडली. मृत रामपत (वय, ६५) हे मंगळवारी आपल्या घरात झोपले होते. याच संधीचा फायदा घेऊन त्यांची पत्नी सुमित्रा (वय, ६०) हिने घराला आग लावली. आग लावल्यानंतर रामपत यांना बाहेर पडता येऊ नये, यासाठी तिने दरवाजाला बाहेरून कुलूप लावले आणि ती फरार झाली. काही वेळाने घरातून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली. काहीतरी अघटीत घडल्याच्या भीतीने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता, आत रामपत यांचा पूर्णपणे जळालेला मृतदेह आढळला.
पोलीस तपासात आणि गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपत आणि सुमित्रा यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सतत भांडणे होत होती. धक्कादायक बाब म्हणजे, सुमित्राने याआधीही रामपत यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. आरोपी महिला सुमित्राविरुद्ध हत्येचा (कलम ३०२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून फरार सुमित्राचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती श्यामदेवरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक सिंह यांनी दिली.
Web Summary : In Uttar Pradesh, a woman locked her husband inside their home and set it ablaze following domestic disputes. The husband, 65, died in the fire. Police have registered a murder case and are searching for the absconding wife. Previous attempts on his life were reported.
Web Summary : उत्तर प्रदेश के महाराजगंज में घरेलू विवाद के बाद एक महिला ने अपने पति को घर में बंद करके आग लगा दी, जिससे उसकी मौत हो गई। पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर आरोपी पत्नी की तलाश शुरू कर दी है। पहले भी जान से मारने की कोशिश की गई थी।