चंडीगड : हरयाणातील नारनौलमध्ये हनीट्रॅपच्या प्रकरणात १० लाखांची मागणी करणाऱ्या महिलेला १ लाख रुपये घेताना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. आरोपी महिलेने तरुणाला आपल्या जाळ्यात ओढून त्याच्याशी संबंध निर्माण केले होते. त्याचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि त्यानंतर दहा लाख रुपयांची मागणी केली होती.ब्लॅकमेलिंगच्या या प्रकरणातील तरुणाने पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. नारनौलच्या पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक स्थापन केले आणि एक लाख रुपये घेतल्यानंतर आरोपी महिलेला अटक केली. तिची आता चौकशी सुरू आहे.मुकेशने म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी एका महिलेने त्याला पाच-सहा वेळा फोन केले. त्याला तिच्या घरी येण्यास सांगितले. तो तिच्या घरी गेला तेव्हा महिलेने त्याच्याशी बळजबरीने संबंध निर्माण केले आणि याचा व्हिडीओही बनवला. त्यानंतर महिलेने अश्लील व्हिडीओ दाखवून दहा लाख रुपये मागितले. तसेच सोन्याची बांगडी व साखळी देण्याची मागणी केली.
Honeytrap: महिलेने बळजबरीने संबंध ठेवत केला अश्लील व्हिडीओ, १० लाखांची केली मागणी, झाली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 06:36 IST