शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पंचकुलामध्ये हिंसाचार भडकविण्यासाठी हनीप्रीतने दिले एक कोटी पंचवीस लाख !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 6:04 PM

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला बलात्कारप्रकरणी सीबीआय न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर पंचकुला परिसरात उळलेल्या हिंसाचारप्रकरणी मोठा खुलासा समोर आला  आहे. 

ठळक मुद्देउळलेल्या हिंसाचारप्रकरणी मोठा खुलासाहिंसाचार भडकविण्यासाठी 1.25 कोटीडेरा सच्चा सौदाच्या सदस्यांना नोटीस

पंचकुला : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला बलात्कारप्रकरणी सीबीआय न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर पंचकुला परिसरात उळलेल्या हिंसाचारप्रकरणी मोठा खुलासा समोर आला  आहे. गुरमीत राम रहीम याची मानलेली मुलगी हनीप्रीत हिच्यावर हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप पोलिसांनी केला असून याप्रकरणी तिला अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीतने हिंसाचार भडकविण्यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपये दिल्याचे उघड झाले आहे. पंचकुलामधील नाम चर्चा घरचे प्रमुख चमकौर सिंहने याबाबत खुलासा केला आहे. डे-यामध्ये 17 ऑगस्टला झालेल्या बैठकीनंतर हनीप्रीतने चमकौर यांना पैसे पाठविले होते. दुसरीकडे, पोलिसांनी डेरा सच्चा सौदाच्या 45 सदस्य असलेल्या व्यवस्थापन कमिटीला नोटीस पाठविली आहे. तसेच, त्यांना चौकशीमध्ये सहभागी होण्याचे निर्देष दिले आहेत. या 45 सदस्यांनी हिंसाचार भडकविण्यासाठी मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. पंचकुलामध्ये 25 ऑगस्टला राम रहीम याला दोन साध्वींवर बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरविल्यानंतर हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. तसेच, हिंसाचारादरम्यान, जमावाने 100 हून अधिक गाड्यांना आग लावली होती आणि मीडियावर हल्ला केला होता. हनीप्रीतने राम रहीमची पोलीस स्टेशनमधून सुटका करण्यासाठी अशाप्रकारे षडयंत्र रचले होते. मात्र हे षडयंत्र पोलिसांनी मोडून काढले. दरम्यान, याप्रकरणी हनीप्रीत विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला जवळपास 38 दिवसानंतर अटक केली आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत हनीप्रीतने दावा केला आहे की, ती नेपाळला गेली नव्हती. पंजाबच्या भटिंडामधील एका डेरा समर्थकाच्या घरात मी लपली होती. हरियाणा पोलिसांना सुरूवातीच्या चौकशीत यापेक्षा जास्त माहिती मिळाली नाही. हनीप्रीत भटिंडामध्ये असल्याची माहिती पोलिसांना सुखदीप नावाच्या एका महिलेकडून समजली होती. सुखदीप डेऱ्याची अनुयायी आहे. तिचं कुटुंब डेऱ्यामध्येच राहते. भटिंडामध्ये सुखदीपची जमीन आणि घर आहे. त्याठिकाणी सुखदीप 2 सप्टेंबरनंतर राहायला गेली होती. हनीप्रीतची पंचकुलाच्या चंडीमंदिर पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 5 तास सुनावणी झाली. पंचकुलाचे पोलीस अधिकारी एएस चावला यांनी हनीप्रीतची चौकशी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. चौकशीच्या सुरूवातीपासून हनीप्रीत जास्त माहिती देत नाहीये. पण तिची चौकशी सुरूच राहणार आहे. कोर्टात हजर केल्यानंतर हनीप्रीतला पोलीस रिमांडमध्ये घेतले जाणार आहे. हनीप्रीत गेल्या काही दिवसांपासून आपल्याकडेच राहत होती, असे हनीप्रीतबरोबर अटक केलेल्या महिलाने चौकशीदरम्यान सांगितले आहे. 

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीम