शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला वायुदलाचा अधिकारी; पाकिस्तानला देत होता गोपनीय माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 06:00 IST

इंटर स्टेट इंटलिजन्स या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतीय हवाई दलाविषयीची गोपनीय माहिती पोहोचविल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी गुरुवारी ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह यांना अटक केली.

नवी दिल्ली : इंटर स्टेट इंटलिजन्स या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारतीय हवाई दलाविषयीची गोपनीय माहिती पोहोचविल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी गुरुवारी ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह यांना अटक केली. हवाई दलाच्या मुख्यालयातून अरुण मारवाह त्यांच्या मोबाइलद्वारे अत्यंत हवाई दलाशी संबंधित अतिमहत्त्वाच्या कागदपत्रांचे फोटो काढून ते व्हॉट्सअ‍ॅपवरुन आयएसआयला पाठवित होते, असे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे उपायुक्त प्रमोद कुशवाहा यांनी दिली.अरुण मारवाह यांच्या गेल्या काही दिवसांतील हालचालींविषयी शंका आल्याने, हवाई दलाच्या गुप्तचर अधिकाºयांनी त्यांना ३१ जानेवारी रोजी ताब्यात घेतले होते. अरुण मारवाह (वय ५१ वर्षे) यांना आयएसआयने फेसबुकद्वारे ‘हनी ट्रॅप’मध्ये ओढले होते, असे असे सूत्रांनी सांगितले. आपण मॉडेल्स असल्याचे भासवून आयएआयच्या एजंट्सनी त्यांना भुरळ घातली होती.आर्थिक देवाण-घेवाण नाही?मात्र, या प्रकरणात कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे पुरावे सापडलेले नाहीत. केवळ लैंगिंक संबंधांविषयीच्या संदेशांच्या बदल्यात हा अधिकारी युद्धसरावत, तसेच युद्धाशी संबंधित लढाऊ विमानांची माहिती देत होता. या अधिकाºयामुळेच ‘गगन शक्ती’ या हवाई दलाच्या सरावाची माहितीही पाकिस्तानला मिळाली, असे सूत्रांनी सांगितले.मोबाइल फॉरेन्सिक लॅबकडेमारवाहला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिल्लीच्या लोधी कॉलनीत त्याची चौकशी सुरू आहे.गुप्तचर कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा मोबाइल ताब्यात घेण्यात आला असून, तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आला आहे. या अधिका-याचे पोस्टिंग हवाई दलाच्या मुख्यालयात होते. तेथून आपणाला ही सारी माहिती मिळाली, अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली, असे कळते.मारवाह यांना आठवडाभर लैंगिक भावना उत्तेजित करणारे, तसेच अश्लील संदेश मॉडेल्सच्या नावाखाली आयएसआयचे एजंट्स पाठवित होते. त्यानंतर, त्यांनी मारवाह यांच्याकडून हवाई दलाच्या युद्धसरावाची माहिती मागितली आणि त्यांनी ती माहिती फोटोंसह व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठविली, असे उघड झाले आहे.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलCrimeगुन्हाArrestअटक