शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘डेटिंग’साठी दिसणे नव्हे प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 06:08 IST

तरुण-तरुणांचे हेतू स्पष्ट असल्याचे अभ्यासातून उघड

लोकमत न्यूज नेटवर्कबंगळुरू : जेव्हा ‘डेटिंग’चा प्रश्न येतो तेव्हा सध्याची तरुणाई अर्थात ‘जेन झेड’ त्यांच्या हेतूबद्दल स्पष्ट असतात आणि ‘सिच्युएशनशिप’ (तेवढ्यापुरती, नात्याला नाव नाही, कुठलीही कमिटमेंट नाही) नाते हवे असल्याचे सांगण्यास लाजत नाहीत, असे डेटिंग ॲप ‘टिंडर’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

‘सिच्युएशनशिप’ हा ‘जेन झेड’चा शब्द आहे. त्यात आधी किंवा नंतरचा कोणताही विचार न करता नाते जोडले जाते. नातेसंबंधासाठी सध्याच्या ‘द फ्युचर ऑफ डेटिंग’ या अभ्यासानुसार, बेंगळुरूच्या टिंडर वापरकर्त्यांपैकी ४३ टक्के डेटिंगसाठी प्राधान्याने ‘सिच्युएशनशिप’ची निवड करतात.  (वृत्तसंस्था)

52 टक्के सिंगल्स आहेत डेटिंग ॲप्सवरबेंगळुरूमध्ये सर्वेक्षण केलेल्या ‘सिंगल्स’पैकी अर्ध्याहून अधिक (५२ टक्के) डेटिंग ॲप्स वापरतात. येथील तरुणाईसाठी डेटिंगचा निर्णय घेताना संगीतामधील एकसमान आवड हा एक प्रमुख घटक आहे. ३२ टक्क्यांहून अधिकांनी संगीताची आवड जोडीदाराचे व्यक्तिमत्व ओळखण्यात मदत करते, असे म्हटले आहे. पहिल्या डेटसाठी म्युझिक कॉन्सर्टसारखे कार्यक्रम अनेक बंगळुरूकरांची पहिली पसंती आहे.

कुणाशीही, कधीही नाते... पण सुरक्षित हवे ५४ टक्के तरुणाई भिन्नलिंगी व्यक्तीशी डेटिंगसाठीही तयार आहे आणि ३९ टक्के अन्य जाती-धर्म व संस्कृतीच्या लोकांशीही डेटिंगसाठी खुली आहे. ही पिढी वैयक्तिक सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देते. पुढचे पाऊल उचलण्यापूर्वी ४९ टक्के तरुणाई डेटिंग साइटवर सत्यापित प्रोफाइल आहे का ते तपासते आणि ४६ टक्के धोका टाळण्यासाठी इतर सोशल मीडिया प्रोफाइलदेखील तपासतात.

डेटिंग आत्मशोधाचा मार्ग  nटिंडर इंडियाच्या कम्युनिकेशन्सच्या संचालक आहाना धर म्हणाल्या की, सर्वेक्षणाचा भाग म्हणून बेंगळुरूसह अनेक भारतीय शहरांमध्ये १८ ते ३० वयोगटातील १,०१८ भारतीय तरुणांना प्रश्न विचारण्यात आले. nजेन झेडने पूर्वीचे डेटिंग मापदंड पूर्णपणे नाकारले आहेत. स्वत:ची काळजी घेण्यावर भर दिला जात आहे. मानसिकदृष्ट्या काळजी न घेणारा जोडीदार त्यांना नको आहे.nदिसण्यापेक्षा तरुणाईसाठी जोदीडाराचा हेतू, प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. तरुणाई आत्मशोधाचा मार्ग म्हणूनही डेटिंगकडे पाहते.

 

 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टrelationshipरिलेशनशिपRelationship Tipsरिलेशनशिप