शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

होमवर्क केला नाही; आईने चिमुकलीचे हातपाय बांधून उन्हात झोपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 08:35 IST

शाळेचा गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे आईने चिमुकलीला इतकी कठोर शिक्षा केल्याचे तपासात समोर आले.

नवी दिल्ली : शाळेचा गृहपाठ करत नाही म्हणून एका आईने अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीला हातपाय बांधून रणरणत्या उन्हात छतावर झोपवल्याची संतापजनक घटना राजधानी दिल्लीत घडली. बुधवारी चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियात खळबळ उडाली. दिल्ली पोलिसांनी चिमुकलीच्या आईविरोधात एफआयआर दाखल केला आहे. 

शाळेचा गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे आईने चिमुकलीला इतकी कठोर शिक्षा केल्याचे तपासात समोर आले. ही मुलगी इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी आहे. आईचे नाव सपना, तर वडिलांचे नाव राज कुमार असे आहे. २ जून रोजी ही घटना घडली. हा व्हिडीओ खजुरी खास परिसरातील तुकमीरपूर गल्ली क्रमांक-२ चा असल्याचे निष्पन्न झाले. गृहपाठ पूर्ण न केल्याने मुलीला पाच ते सात मिनिटे शिक्षा केली होती. त्यानंतर मुलीला खाली आणले असे सपनाने पोलिसांना सांगितले. सपनाविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

संतापजनक व्हिडीओ दुपारी कडक उन्हात गच्ची पूर्ण तापलेली असल्यामुळे मुलीच्या शरीराला चटके बसत होते. त्यामुळे ती वेदनेने विव्हळत आई-आई ओरडत होती, पण निर्दयी आईला मुलीची दया आली नाही. 

- असह्य चटके बसत असल्याने चिमुकली स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण हातपाय दोरीने बांधल्यामुळे तिला काहीही करता येत नव्हते. - परिसरातील कोणीतरी तोपर्यंत मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून दुसऱ्या छतावरून व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि बुधवारी तो व्हायरल झाला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी