शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सशस्त्र दलाच्या 700 हून अधिक जवानांनी केल्या आत्महत्या, गृहराज्यमंत्र्यांची राज्यसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:08 IST

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत प्रश्नांच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ)  700 हून अधिक जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच, या कालावधीत  55,555 जणांनी राजीनामा आणि स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. दरम्यान, विभाग किंवा यंत्रणेकडून त्रास होत असल्याने आत्महत्या केल्याचे असे एकही प्रकरण समोर आलेले नाही.  गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत प्रश्नांच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

नित्यानंद राय म्हणाले की, 2020 मध्ये सीएपीएफमध्ये 144 आत्महत्या झाल्या होत्या, तर 2021 मध्ये 157 प्रकरणे समोर आली. तसेच, 2022 मध्ये 138, 2023 मध्ये 157 आणि 2024 मध्ये 134 आत्महत्या झाल्याची प्रकरणे नोंदवली गेली होती. सीएपीएफमध्ये पाच वर्षात एकूण 730 आत्महत्या झाल्या. तसेच, गेल्या पाच वर्षांत 47,891 सीएपीएफ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे आणि 7,664 जणांनी राजीनामा दिला आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये (CAPF) साधारणपणे आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम केले जाते, असे नित्यानंद राय यांनी सांगितले. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांतर्गत मध्ये आसाम रायफल्स (AR), सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP), राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) यांचा समावेश असून हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

1 लाखाहून अधिक पदं रिक्तसीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये 1 लाखाहून अधिक पदे रिक्त असल्याचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत सांगण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 30 सप्टेंबरपर्यंत सीएपीएफ आणि आसाम रायफल्सची एकूण तैनाती संख्या 9,48,204 होती. रिक्त पदं तातडीनं भरण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे,असे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा