शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Home: घरासाठी पैसे नाहीयेत? सरकार करणार मदत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळणार कर्जाचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 11:32 IST

Home: प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत देशातील ग्रामीण भागात बांधली जाणारी घरे पैशांच्या कमतरतेमुळे आता अपूर्ण राहणार नाहीत. ही घरे बांधण्यासाठी ७० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबई : प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत देशातील ग्रामीण भागात बांधली जाणारी घरे पैशांच्या कमतरतेमुळे आता अपूर्ण राहणार नाहीत. ही घरे बांधण्यासाठी ७० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.केंद्र सरकारचा ग्रामविकास विभाग यासाठीच्या मसुद्याला अंतिम रूप देत आहे. क्रेडिट गॅरंटी योजनेंतर्गत संबंधितांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. यामध्ये बचत गटांची (एसएचजी) भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हे कर्ज लाभार्थी बचत गटांच्या हमीवर बँकांकडून घेऊ शकतात.पीएमएवाय अंतर्गत, मार्च २०२४पर्यंत देशात २.७२ कोटी घरे बांधण्याचे लक्ष्य आहे. या योजनेंतर्गत मैदानी भागातील लाभार्थ्यांना १.२० लाख आणि डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना १.३० लाख रुपये पायाभूत सुविधांची घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. हा खर्च केंद्र आणि राज्य सरकार ६०:४०च्या प्रमाणात वाटून घेते. या  योजनेंतर्गत २.४४ कोटी घरे मंजूर करण्यात आली आहेत.

सर्वात मोठी समस्या काय? एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कोरोना महामारीच्या गेल्या दोन वर्षांमध्ये बांधकाम साहित्याच्या किमतीत झालेली वाढ ही लाभार्थींना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे पक्क्या घरांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.  त्यांना या योजनेतून मदत दिली जाईल.

कुठे किती घरांचे लक्ष्य पूर्णसर्वांना घर देण्याच्या योजनेमुळे विशेषत: पुढील १२ महिन्यांत निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये राजकीय परिणाम होण्याची शक्यता आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये घर बांधणीचे लक्ष्य ८५.७५ टक्के इतके पूर्ण करण्यात आले आहेत.

६५ लाख  नवीन घरे दरवर्षीn पीएमएवाय (ग्रामीण) च्या पहिल्या टप्प्यात २०१६ - १७ ते २०१८ - १९ पर्यंत, राज्ये प्रतिवर्षी ३० लाख घरे पूर्ण करण्यासाठी मदत करत आहेत.n तथापि, मिशनचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दरवर्षी ६५ लाख घरांची निर्मिती करावी  लागणार आहे.प्रत्येकाला मिळणार घर n पीएमएआय (ग्रामीण) १ एप्रिल २०१६पासून राबविण्यात येत आहे.  n सरकारने मार्च २०२४पर्यंत पीएमएवाय (ग्रामीण) अंतर्गत २,७१,९२,७९५ पक्की घरे पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. n ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १,९६,६२,९६३ घरे पूर्ण झाली आहेत. आता १६ महिन्यांत ७५,२९,८३२ पक्की घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अनुदानामुळे मोठा फायदासर्वां पंतप्रधान आवाज योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला घर देण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे. शहरी भागात घर घेतल्यास अनुदान म्हणून २.६९ लाखांपर्यंतचे अनुदान देण्यात येत होते. त्याचा मोठा शहरी भागातील घर खरेदीदारांना झाला आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाHomeसुंदर गृहनियोजनbankबँक