शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

गृहमंत्री अमित शहा आज उच्चस्तरीय बैठक घेणार; पूर परिस्थितीशी सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 08:30 IST

काही दिवसातच देशात मान्सूनला सुरुवात होणार आहे. देशातील काही भागात पावसामुळे मोठे नुकसान होत असते, या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह आज बैठक घऊन आढावा घेणार आहेत.

काही दिवसातच देशात मान्सूनला सुरुवात होणार आहे. देशातील काही भागात पावसामुळे मोठे नुकसान होत असते, या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह आज बैठक घऊन आढावा घेणार आहेत. या बैठकीत पुराचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

प्रत्येक वर्षी मान्सूनच्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते बिहार, आसाम आणि इतर पूर्वेकडील राज्यांचा मोठा भाग पाण्याखाली जातो. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि इतर काही राज्यांना पावसाळ्यात भूस्खलन आणि पावसाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.

जीएसटी खटल्यात अधिकाऱ्यांच्या अपिलांसाठी आर्थिक मर्यादा निश्चित

देशातील पूर व्यवस्थापनाच्या एकूण तयारीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह रविवारी एका उच्चस्तरीय बैठक घेणार असल्याची माहिती मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने दिलेली माहिती अशी, राज्यात गेल्या २४ तासांत दोन मृत्यूची नोंद झाली असून, यावर्षीच्या पूर, भूस्खलन आणि वादळात मृतांची संख्या ३९ झाली आहे.

मात्र, राज्यातील पूरस्थितीत किंचित सुधारणा झाली आहे. सध्या १२ जिल्ह्यांमध्ये २,६३,४५२ लोकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यात १३४ मदत छावण्या उभारण्यात आल्या असून त्यामध्ये १७,६६१ लोकांना आश्रय देण्यात आला आहे.

आसाममध्ये पावसामुळे मोठं नुकसान आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारीही येथील पूरस्थिती गंभीर होती. अनेक जिल्ह्यांतील चार लाख लोक पुरामुळे त्रस्त आहेत. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. कोपिली, बराक आणि कुशियारा यासह अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. १९ जिल्ह्यांतील सुमारे चार लाख लोकांना पूरग्रस्त भागात राहावे लागत आहे. या जिल्ह्यांमध्ये बजाली, बक्सा, बारपेटा, बिस्वनाथ, कचार, दररंग, गोलपारा, हैलाकांडी, होजई, कामरूप, करीमगंज, कोक्राझार, लखीमपूर, नागाव, नलबारी, सोनितपूर, दक्षिण सलमारा, तामुलपूर आणि उदलगुरी यांचा समावेश आहे.

आसामच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे करीमगंजला सर्वाधिक फटका बसला. येथे दोन लाख लोक बाधित झाले. यावर्षी पूर, भूस्खलन आणि वादळात मृतांचा आकडा ३६ वर पोहोचला आहे. राज्यभरात १०० हून अधिक मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. या छावण्यांमध्ये सुमारे १४ हजार लोकांनी आश्रय घेतला आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहmonsoonमोसमी पाऊस