नवी दिल्ली : कोरोना महामारीचा मुकाबला करण्यात भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असल्याने घाबरण्याचे काहीच कारण नाही. आपण ही लढाई नक्कीच जिंकू, असा ठाम विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे व्यक्त केला.केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या देशभरातील आस्थापनांमध्ये १.३७ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट असलेल्या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा व्हिडिओ माध्यमाने शुभारंभ केल्यानंतर शहा बोलत होते. शहा यांचे भाषण वेबलिंकने झाले. कादरपूर गावातील सीआरपीएफ आॅफिसर्स ट्रेनिंग अकादमीच्या प्रांगणात प्रत्यक्ष जाऊन त्यांनी पिंपळाचे एक रोपहीलावले.सशस्त्र सुरक्षा दलांचे कौतुकसर्वच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे कौतुक करताना शहा म्हणाले की, देशासाठी तुम्ही करीत असलेल्या अतुलनीय कामाचा गृहमंत्री म्हणून मला खूप अभिमान वाटतो. खास करून एरवीच्या खडतर जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही कोविडच्या आघाडीवर तुम्ही केलेले काम विशेष कौतुकास्पद आहे.
कोरोनायुद्ध भारत नक्की जिंकेल, गृहमंत्री अमित शहा यांना ठाम विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 04:25 IST