शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मिशन मोड ऑन! अमित शहा पुन्हा सक्रिय; नव्या जबाबदारीसह गृहमंत्री लागले कामाला

By कुणाल गवाणकर | Updated: November 15, 2020 13:05 IST

कोरोनावर मात केलेल्या अमित शहांकडे नवी अन् महत्त्वाची जबाबदारी

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राजकीय बैठका, सभांपासून दूर आहेत. कोरोनाची लागण, कोरोनावर मात केल्यानंतर निर्माण झालेल्या समस्या यांच्यामुळे अमित शहा बिहार विधानसबा निवडणुकीपासूनही दूरच होते. मात्र आता अमित शहा सक्रिय झाले आहेत. त्यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली असून त्यासाठी त्यांनी आज अतिशय महत्त्वाची बैठक बोलावली आहे....म्हणून ट्विटरने काही काळासाठी हटवला अमित शहांचा डीपीदिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. दररोज कोरोनाचे सात हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्यानं आरोग्य व्यवस्थेची चिंता वाढली आहे. या परिस्थितीची गृह मंत्रालयानं गंभीर दखल घेतली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शहांनी आज नवी दिल्लीतल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये एक बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित असतील.दिल्लीत काल दिवसभरात ४९ हजार ६४५ नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. राजधानीत कोरोना संक्रमणाचा दर १४.७८ टक्के इतका आहे. काल दिल्लीत ९६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ७ हजार ५१९ वर पोहोचली. दिल्लीत सध्याच्या घडीला ४४ हजार ४५६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ८२ हजार १७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्यांचं प्रमाण ८९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल