शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची धास्ती : 31 मार्चपर्यंत शाळांना सुट्टी, बायोमेट्रीक हजेरीही बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 15:21 IST

ओडिशा येथे कोरोना व्हायरस संशयीत महिला रुग्णालयातून पसार झाल्याने गोंधळ उडाला

पेइचिंग: कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाचा फटका जगातल्या 80 देशांना बसला आहे. आतापर्यंत तीन हजारहून अधिक जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. कोरोनाच्या रचनेची नेमकी माहिती नसल्यानं त्यावर उपचार करणं कठीण जात आहे. भारतातदेखील कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये 2 संशयित असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर, तेथील प्राथमिक शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. 

ओडिशा येथे कोरोना व्हायरस संशयीत महिला रुग्णालयातून पसार झाल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे, भारतताही कोरोनाचा गंभीरतेबाबत सर्वजण जागरूक झाल्याचे दिसून येत आहे. भारतात रुग्णांचा आकडा 30 असून कोरोनाचा भारतीयांना संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अफवांमुळे लोक धास्तावून गेले आहेत. दिल्लीत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्राथमिक शाळांना 31 मार्चपर्यंत सुटी देण्यात आली आहे. दिल्लीत व देशाच्या अन्य भागांतही होळीसह जवळपास सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले आहेत.

दिल्लीनंतर आता, जम्मू आणि काश्मीरमधील प्रशासनानेही 31 मार्चपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, राज्यातील बायोमेट्रीक पद्धतीने होणारी हजेरी (अटेंडंट) बंद करण्यात आली आहे. नोंदणी बुकात नोंद करुन पुन्हा जुन्या पद्धतीने हजेरी सुरू करण्यात आली आहे, राज्याचे प्रमुख सचिव रोहित कंसल यांनी याबाबत माहिती दिली. जम्मू आणि काश्मीरमध्ये 2 संशयीत कोरोना व्हायरल सापडले आहेत. या दोन्ही संशयीतांवर उपचार सुरू असून ते कोरोना पॉझिटीव्ह असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या या दोन्ही रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोनाSchoolशाळाJammu Kashmirजम्मू-काश्मीर