शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

जेएनयू आंदोलनामागे हाफिज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 04:19 IST

जेएनयूतीलअफजल गुरूच्या उदात्तीकरणास लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याचा पाठिंबा असल्याचा दावा करीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी नव्या वादाला जन्म दिला.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) अफजल गुरूच्या उदात्तीकरणास लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याचा पाठिंबा असल्याचा दावा करीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी नव्या वादाला जन्म दिला. त्यांच्या या दाव्यानंतर डाव्यांसह विविध राजकीय पक्षांनी त्यांना यासंदर्भात पुरावे देण्याची मागणी केली.जेएनयूतील अफजल गुरूचे उदात्तीकरण करणारा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात लागलेले भारतविरोधी नारे यामागे सईदचा पाठिंबा आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. देशाच्या एका प्रतिष्ठित विद्यापीठात जे काही घडले ते दुर्दैवी आहे. मात्र अशावेळी संपूर्ण देशाने एकजूट होऊन सौहार्दाचे दर्शन घडवायला हवे. राजकीय पक्षांनीही या मुद्द्यावरून राजकारण करणे थांबवावे, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना केले. दरम्यान, राजनाथ सिंह यांच्या दाव्यानंतर राजकीय गोटात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राजनाथ सिंह यांचा दावा अतिशय गंभीर आहे. जेएनयूतील घटनेमागे हाफिज सईद असेल तर त्यांनी याचे पुरावे द्यावेत, असे टिष्ट्वट नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केले. माकपाचे महासचिव सीताराम येचुरी, भाकपा नेते डी राजा यांनीही याबाबातचे पुरावे सार्वजनिक करण्याची मागणी केली. राजनाथ यांचा दावा गंभीर आहे. त्यांच्याकडे या दाव्याच्या समर्थनार्थ ठोस पुरावे असावेत, अशी आम्ही आशा करतो. सईदने कथितरीत्या टिष्ट्वट करून पाकिस्तानी नागरिकांना जेएनयूतील घटनेचे समर्थन करण्याचे आवाहन केले गेले आहे. पोलिसांनी तत्काळ या टिष्ट्वटचा तपास सुरू केला. शिवाय यानंतर लगेच दिल्ली पोलिसांच्या पोलीस आयुक्त कार्यालयाने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर अकाऊंटवरून अलर्ट जारी करीत, जेएनयू व देशातील विद्यार्थी समुदायास सतर्क आणि दक्ष राहण्याचे तसेच कुणाच्याही बहकाव्यात न येण्याचे आवाहन केले होते. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राजनाथसिंह यांनी उपरोक्त दावा केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)..................सात विद्यार्थ्यांवर वर्गबंदीविद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याच्यासह सात विद्यार्थ्यांना सोमवरपासून वर्गांमध्ये बसू न देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या उच्चस्तरीय चौकशी समितीने घेतला आहे. दरम्यान कन्हय्या वगळता यापैकी सात विद्यार्थ्यांना चौकशी समितीपुढे हजर राहण्याचेही बजावण्यात आले आहे, असे. जेएनयूचे निबंधक भूपिंन्दर जुटशी यांनी रविवारी सांगितले. कन्हय्या कुमार सध्या पोलिस कोठडीत आहे.—————————विद्यापीठाची अप्रतिष्ठा नकोविद्यापीठात घडलेल्या या एका घडामोडीवरून सरसकट संपूर्ण विद्यापीठास ‘देशद्रोही’ ठरवू नका, असे आवाहन विद्यापीठातील प्राध्यापकांनी केले आहे. समाजशास्त्राच्या एका प्राध्यापकाने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर संपूर्ण विद्यापीठास बदनाम करणे गैर असल्याचे मत मांडले. विद्यापीठ परिसरात वादग्रस्त कार्यक्रमात भारतविरोधी नारेबाजी झाली असेल नसेल. पण या घटनेनंतर जेएनयू म्हणजे राष्ट्रविरोधी कारवायांचा गढ असल्याचे सांगून विद्यापीठाची प्रतिमा मलीन केली जात आहे. आम्ही अनेक वर्षांपासून येथे शिकवत आहोत. जेएनयू कायम शैक्षणिक आणि लोकशाही संस्कृतीचे प्रतीक राहिले आहे. अशास्थितीत एका घटनेवरून संपूर्ण जेएनयूला राष्ट्रविरोधी म्हणणे गैर आहे, असे ते म्हणाले. भाषाशास्त्राच्या अन्य एका प्राध्यापकांनीही असेच मत व्यक्त केले. विद्यापीठाने संबंधित प्रकरणाची चौकशी आरंभली आहे. पोलीस चौकशी करीत आहेत. दिल्ली सरकारनेही दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण प्रतीक्षा करू शकणार नाही का? विद्यापीठाला अतिरेक्यांचा गढ म्हणण्याची घाई का? असे सवाल त्यांनी केले. विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हय्या कुमार याला अटक करणे गैर असल्याचे मतही या प्राध्यापकांनी मांडले. विद्यार्थ्यांनी काही चुकीचे केले असेल तर तो शिस्तभंगाचा मुद्दा आहे देशद्रोहाचा नाही, असे ते म्हणाले.................माझा मुलगा तसा नाहीया प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कन्हय्या कुमाराच्या आईने ‘माझ्या पोराला अतिरेकी ठरवू नका’, अश्ी विनंती पाणावलल्या डोळ््यांनी केली.बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात राहणाऱ्या कन्हय्याची आई मीनादेवी यांच्या डोळ्यांतून, श्ेजाऱ्यांच्या घरी टीव्ही पाहताना अश्रूधारा वाहू लागल्या. कन्हय्याला अटक केल्याचे मला कळले. मी टीव्हीवर पाहिले. माझ्या मुलाने कधीही वडिलधाऱ्यांचा अपमान केला नाही. देशाचा अपमान तर नाहीच नाही. माझ्या मुलाला अतिरेकी ठरवू नका. तो असे करूच शकत नाही, असे सांगताना मीनादेवींचा कंठ दाटून आला. मीनादेवी अंगणवाडी कार्यकर्त्या आहेत. त्या महिन्याला साडेतीन हजार रुपये कमावतात. त्या आणि त्यांचा मोठा मुलगा मणिकांत हे दोघेचे घराच कमावते आहेत. त्यांचे ६५ वर्षीय पती लकवाग्रस्त असून अंथरुणाला खिळलेले आहेत.