शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'सोशल मीडियावर सैनिकांशी चॅटिंग करू नका', काश्मिरी मुलींना हिज्बुल मुजाहिद्दीनची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 10:36 IST

मुलींना सैन्यातील जवान व अधिकाऱ्यांपासून लांब रहायला सांगितलं आहे.

श्रीनगर- काश्मिरी मुलींना भारतीय सैन्यातील जवान आणि अधिकाऱ्यांपासून दूर राहा, त्यांच्याशी सोशल मीडियावर चॅटिंग करू नका, अशी धमकी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने काश्मीरमधील मुलींना दिली आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू यांनी एक ऑडिओ क्लिप जारी करून काश्मिरी मुलींना सैन्यातील जवान व अधिकाऱ्यांपासून लांब रहायला सांगितलं आहे. भारतीय सैन्याकडून काश्मिरी मुलींचा हनीट्रॅप म्हणून वापर केला जाऊ शकतो, असं रियाज नायकू याने म्हटलं आहे. 

मेजर गोगोई प्रकरणानंतर हिज्बुलने ही पावलं उचलली आहेत. 10 मिनिटाच्या ऑडिओ क्लिपमध्ये त्याने म्हटलं आहे की,'सैन्यातील अधिकारी व जवान काश्मिरी मुली विशेष करून शाळेतील मुलींशी संबंध बनवत असल्याची आम्हाला सूचना मिळाली आहे. दहशतवाद्यांबद्दल त्यांच्याकडून माहिती मिळविण्यासाठीची ही खेळी आहे, असं या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. लष्कराचे जवान या मुलींबरोबर संपर्क प्रस्थापित करून त्यांच्याकडून वाईट गोष्टी करून घेतील, असंही त्याने म्हटलं आहे.  भारतीय सैन्याकडून मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांना हिज्बुलविरोधात वापरलं जात आहे, असा दावा त्याने केला आहे. त्याची ऑडिओ क्लिप काश्मीरमध्ये व्हायरल झाली आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, नायकू (वय 30) हा काश्मीर खोऱ्यातील सर्वात जुना दहशतवादी आहे. तो  2016 मध्ये हिज्बुलचा कमांडर बुरहान वानीबरोबर दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. 'सोशल मिडियावर लष्कर, पोलीस आणि अनोळखी व्यक्तींशी बोलू नका. त्यांना तुमची खासगी माहिती देऊ नका, अशी मी माझ्या बहिणींना विनंती करतो, असं त्याने ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मेजर गोगोई एका मुलीबरोबर हॉटेलमध्ये दिसले होते. ती मुलगी अल्पवयीन असल्याच्या संशयावरून हे प्रकरण पोलिसात गेलं. तसंच गोगोई यांची चौकशीही झाली. या प्रकरणातील मुलगी गोगोई यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आल्याचं तिने सांगितलं होतं.