शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास रचत कर्नल गीता राणा झाल्या ‘कमांडर’, सन्मान मिळवणाऱ्या देशातील पहिल्या महिला अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 06:54 IST

अलीकडेच भारतीय लष्कराने महिला अधिकाऱ्यांना कमांडरची भूमिका स्वीकारण्यास मान्यता दिली आहे.

नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या आघाडीवर क्षेत्रीय कार्यशाळेचे (फिल्ड वर्कशॉप) ‘कमांडर’ म्हणून नेतृत्व करून भारतीय लष्करातील कर्नल गीता राणा यांनी इतिहास रचला आहे. असा पराक्रम करणाऱ्या भारतीय लष्कराच्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. अलीकडेच भारतीय लष्कराने महिला अधिकाऱ्यांना कमांडरची भूमिका स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर कर्नल गीता हे यश मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. कर्नल गीता चीन सीमेवर तैनात असलेल्या स्वतंत्र क्षेत्रीय कार्यशाळेचे नेतृत्व करणार आहेत.

लष्कराने अलीकडेच अभियंत्यांची तुकडी, आयुधे, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल अभियंते आणि इतर शाखांमध्ये स्वतंत्र युनिट्सचे नेतृत्व करण्यासाठी महिला लष्करी अधिकाऱ्यांना १०८ रिक्त जागा सोडल्या आहेत. आगामी काळात इतर महिला लष्करी अधिकाऱ्यांनाही अशा नियुक्त्या दिल्या जाऊ शकतात. त्यांना मंडळांकडून मान्यता मिळू शकेल आणि त्यांना नेतृत्वाची भूमिका देता येईल. भविष्यात त्यांना उच्च पदांवर नियुक्ती दिली जाऊ शकते.

ग्रुप कॅप्टन शालिजा लढाऊ युनिटचे नेतृत्व करणारभारतीय हवाई दलाने एक ऐतिहासिक निर्णय घेत ग्रुप कॅप्टन शालिजा धामी यांची पश्चिम सेक्टरच्या आघाडीवरील लढाऊ युनिटचे नेतृत्व करण्यासाठी निवड केली आहे. हवाई दलाच्या इतिहासात प्रथमच एका महिला अधिकाऱ्याला या युनिटचे नेतृत्व देण्यात आले आहे. पश्चिमेकडील क्षेत्र भारत-पाकिस्तान सीमा क्षेत्रात येते. 

असाही सन्मान२००३ मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झालेल्या शालिजा सध्या हवाई दलाच्या फ्रंटलाइन कमांड मुख्यालयाच्या ऑपरेशन्स शाखेत कार्यरत आहेत. फ्लाइंग ब्रँचमध्ये कायमस्वरूपी कमिशन मिळालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्या चेतक आणि चित्ता हेलिकॉप्टर चालवतात. त्यांना २,८०० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे.

  • भारतीय लष्कर मित्र देशांसोबतच्या लष्करी सरावांमध्ये महिला सैनिकांनाही सहभागी करून घेत आहे. यासोबतच महिला लष्करी अधिकाऱ्यांनाही शांती मोहिमेसाठी पाठवले जात आहे. 
  • लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे महिला अधिकाऱ्यांना सर्व संधी देण्याच्या बाजूने आहेत. लवकरच लष्करातील तोफखाना रेजिमेंटमध्ये महिला लष्करी जवानांचीही नियुक्ती होऊ शकते.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानWomenमहिला