शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 04:51 IST

माझ्यासारख्या एका सामान्य घरातील व्यक्तीवर देशातील सर्वोच्च पदाची जबाबदारी सोपवून, सव्वाशे कोटी भारतीय नागरिकांनी जो विश्वास टाकला आहे, तो सार्थ करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : माझ्यासारख्या एका सामान्य घरातील व्यक्तीवर देशातील सर्वोच्च पदाची जबाबदारी सोपवून, सव्वाशे कोटी भारतीय नागरिकांनी जो विश्वास टाकला आहे, तो सार्थ करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन, अशी ग्वाही देऊन रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी भारतीय प्रजासत्ताकाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून अत्यंत विनम्रतेने पदभार स्वीकारला.संसद भवनाच्या मध्यवर्ती दालनात झालेल्या दिमाखदार सोहळ््यात सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग खेहर यांनी ७१ वर्षीय कोविंद यांना पदाची शपथ दिली. यानंतर, दिल्या गेलेल्या २१ तोफांच्या सलामीने भारताचा नवा राष्ट्रप्रमुख अधिकारावर आल्याची जगाला द्वाही दिली गेली. शपथविधीस प्रथेनुसार मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामीद अन्सारी व लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन कोविंद यांच्यासोबत मुख्य मंचावर होते. समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री, देवेगौडा व डॉ. मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान, सर्व राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य आणि देशोदेशीचे राजदूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.शपथग्रहणानंतर छोटेखानी भाषण करून कोविंद यांनी मुखर्जी यांच्यासह उपस्थितांच्या अभिनंदनाचा हात जोडून स्वीकार केला. काही सदस्यांनी ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्याने कोविंद यांच्या रूपाने भारताला भाजपाचे पहिले राष्ट्रपती मिळाल्याचेही सूचित झाले.शपथ ग्रहण सोहळ्यानंतर कोविंद यांनी सभागृहातील नेत्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते राष्ट्रपतींच्या लिमोजीन कारने राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले. यावेळी मुखर्जी त्यांच्या डाव्या बाजूला बसले होते. हा ताफा संसद भवनातून राष्ट्रपती भवनाकडे जात असताना हलकासा पाऊस सुरू झाला आणि संपूर्ण परिसर या पावसात चिंब झाला. कोविंद आणि मुखर्जी राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि कोविंद यांनी रजिस्टरवर हस्ताक्षर करून पदभार स्वीकारला. त्यानंतर प्रणव मुखर्जी यांना नव्या १०, राजाजी मार्ग येथील निवासस्थानी सोडण्यासाठी कोविंद हे मुखर्जी यांच्यासोबत लिमोजीन कारमध्ये गेले.हा शपथविधी मैलाचा दगड : नरेंद्र मोदीजन संघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जो प्रवास सुरू केलाहोता, त्यात रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतिपदासाठीचा शपथविधी हा मैलाचा दगड ठरला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हटले.भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी यांनी हे भाष्यभाजपा संसदीय पक्षाच्या येथेझालेल्या बैठकीत केले. या बैठकीला खासदार व भाजपाचे नेते उपस्थित होते. मुखर्जी यांनी १९५१ मध्ये जन संघाची स्थापना केली होती.राष्ट्रपती बनलेले कोविंद हे भाजपाचे पहिले नेते ठरले असल्यामुळे, मोदी यांच्या या भाष्याला विशेष महत्त्व आहे.