शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचलात जयराम ठाकूरच? नड्डांची शक्यता मावळली; गुजरातेत रुपाणी-नितीन पटेल जोडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:07 IST

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड होण्याची शक्यता मावळली असून, जयराम ठाकूर यांच्या गळ्यातच ती माळ पडेल, अशी शक्यता दिसत आहे. तसेच गुजरातचे मुख्यमंत्रिपद पुन्हा विजय रुपाणी यांना मिळेल आणि नितीन पटेल हेच उपमुख्यमंत्री होतील, असे दिसत आहे.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड होण्याची शक्यता मावळली असून, जयराम ठाकूर यांच्या गळ्यातच ती माळ पडेल, अशी शक्यता दिसत आहे. तसेच गुजरातचे मुख्यमंत्रिपद पुन्हा विजय रुपाणी यांना मिळेल आणि नितीन पटेल हेच उपमुख्यमंत्री होतील, असे दिसत आहे.हिमाचलमध्ये संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन व केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर हे केंद्रीय निरीक्षक म्हणून तेथील ४४ आमदारांची मते जाणून घेणार असले तरी राज्यात प्राबल्य असलेल्या ठाकुरांचा प्रतिनिधी म्हणून जयराम ठाकूर यांनाच मुख्यमंत्री केले जाईल, अशी शक्यता आहे. प्रेमकुमार धुमल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सत्पाल सट्टी व माजी मंत्री गुलाबसिंग ठाकूर हे पराभूत झाल्यामुळे रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असलेले व चारदा निवडून आलेले जयराम यांचीच निवड अपेक्षित आहे.गुजरातमध्ये विजय रुपाणी यांची निवड निश्चित मानली जात आहे. ते अमित शहा यांच्या विश्वासातील असल्याने त्यांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता दिसत नाही. आनंदीबेन पटेल यांना पदावरून दूर केल्यानंतर अमित शहा यांनीच रुपाणी यांच्यासाठी सारी ताकद लावली होती. आताही तसेच होईल. शिवाय आता ते ५६ हजार मतांनी विजयी झाले आहेत. पाटीदार समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी नितीन पटेल हेच पुन्हा उपमुख्यमंत्री होतील, असे सांगण्यात येते. मात्र तेथेही अर्थमंत्री अरुण जेटली व सरचिटणीस सरोज पांडे केंद्रीय निरीक्षक म्हणून आमदारांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.

टॅग्स :Himachal Pradesh Assembly Election Results 2017हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017Himachal Pradeshहिमाचल प्रदेश