शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 12:03 IST

Tirupati Laddu Prasadam Controversy : आंध्र प्रदेश सरकारने मंदिराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदू समाजाकडे सोपवावे, अशी मागणीही विहिंपने केली आहे.

Tirupati Laddu Prasadam Controversy : तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचे उघडकीस आल्यापासून राजकारण चांगलेच तापलं आहे. या मुद्द्यावर अनेक राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) शुक्रवारी (२० सप्टेंबर) मोठी मागणी केली आहे. तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा कथित वापर असहनीय असल्याचे विहिंपने म्हटले आहे. आंध्र प्रदेश सरकारने मंदिराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हिंदू समाजाकडे सोपवावे, अशी मागणीही विहिंपने केली आहे.

विहिंपचे आंतरराष्ट्रीय महामंत्री बजरंग बागरा यांनीही देशभरातील हिंदूंची सर्व मंदिरे आणि अन्य देवस्थान सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी केली. तसेच, तिरुपती मंदिराच्या प्रसादला अपवित्र करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही बजरंग बागरा यांनी म्हटले आहे. "तिरुपतीच्या घटनेने विश्व हिंदू परिषदेचा विश्वास अधिक दृढ होतो की, मंदिरांवर सरकारी नियंत्रणामुळे राजकीय प्रवेश होतो. तेथे (सरकारी-नियंत्रित मंदिरांमध्ये) गैर-हिंदू अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यामुळे प्रसाद मुद्दाम अशाप्रकारे अपवित्र केला जातो", असा आरोप बजरंग बागरा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे.

हिंदू मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे सरकारी नियंत्रणाखाली राहू नयेत, अशी विहिंपची अनेक दिवसांपासून मागणी आहे. तिरुपती लाडू प्रसादामधील प्राण्यांच्या चरबीचा कथित वापर हे असहनीय आणि घृणास्पद कृत्य आहे. यामुळे संपूर्ण हिंदू समाज व्यथित आणि दुखावला आहे. हिंदू समाज आपल्या श्रद्धेवर असे वारंवार होणारे हल्ले सहन करणार नाही, असे बजरंग बागरा म्हणाले. तसेच, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आंध्र प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार यावर गांभीर्याने विचार करतील, असा आम्हाला विश्वास आहे. तिरुपती लाडू प्रकारणाचा निःपक्षपातीपणे तपास करून त्यात सहभागी असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे बजरंग बागरा यांनी म्हटले आहे. 

विनोद बन्सल यांनीही केलं मोठं विधान विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनीही तिरुपती मंदिर आणि देशभरातील इतर सर्व मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, "फक्त तिरुपती मंदिरावर सरकारचे नियंत्रण नाही. तर देशभरातील राज्यांमध्ये चार लाखांहून अधिक मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. या मुद्द्यावर आमची भूमिका स्पष्ट आहे की, सरकारने मंदिरे आणि त्यांची मालमत्ता हिंदू समाजाच्या ताब्यात द्यावी. मंदिरांचे खरे विश्वस्त हिंदू आहेत, सरकार नाही. हिंदू मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांवर सरकारी नियंत्रणाविरोधात विहिंप लवकरच मोठी मोहीम सुरू करणार आहे."

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटHinduहिंदूTempleमंदिर