शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

सरकार गेले तरी चालेल, अयोध्येत राम मंदिर हवेच! हिंदू संतांचा सरकारकडे आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 07:11 IST

अयोध्येतील बाबरी मशिद-राम मंदिराच्या वादावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालायने लांबणीवर टाकल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीसाठी ठोस पावले टाकण्यासाठी केंद्र सरकारवर हिंदूंचा दबाव दिवसेदिवस वाढत आहे.

नवी दिल्ली : अयोध्येतील बाबरी मशिद-राम मंदिराच्या वादावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालायने लांबणीवर टाकल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीसाठी ठोस पावले टाकण्यासाठी केंद्र सरकारवर हिंदूंचा दबाव दिवसेदिवस वाढत आहे. ‘आता संयम संपत चालला आहे. गरज पडली तर राम मंदिरासाठी पुन्हा १९९२ प्रमाणे आंदोलन सुरु करावे लागेल’ अशी निर्वाणीची भाषा रा. स्व. संघाने केल्यानंतर आता हिंदू संतांनी सरकारला वेठीस धरले आहे.गेले दोन दिवस येथील तालकटोरा स्टेडियममध्ये भरलेल्या अखिल भारतीय संत समितीच्या अधिवेशनात देशभरातून आलेल्या तीन हजारांहून अधिक संतांनी अयोध्येतील राम मंदिराखेरीज गोरक्षा व गंगा शुद्धिकरणाची एकमुखाने मागणी केली. येत्या ६ डिसेंबरपूर्वी केंद्र सरकारनेयासाठी निर्णायक पाऊल उचलावे, असा एकूण सूर होता.अधिवेशनाचा समारोप करताना समितीचे निमंत्रक रामानंद हंसदेवाचार्य यांनी तर आवाहन न करता केंद्र सरकारने राम मंदिरासाठी येत्या अधिवेशनात कायदा करावा किंवा वटहुकूम काढावा, असा आदेशच देऊन टाकला. सध्याच्या केंद्र सरकारचे काम समाधानकारक असले तरी आगामी निवडणुकीत ‘गाय’ ‘गंगा’ व ‘गोविंद’ यांचे रक्षण करणाऱ्यांनाच जनतेने निवडून द्यावे, असे आवाहन संतांनी केले.अधिवेशनात भाषण करताना जगद््गुरु रामभद्राचार्य यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले की, आपलीच माणसे सत्तेवर बसवूनही ते इतरांसारखे वागतात हे पाहून धक्का बसला. अयोध्येत राम मंदिर उभे राहायलाच हवे. मग त्यासाठी (पान २ वर)मशिदीच्या आग्रहाने हिंदूंना असहिष्णू करू नकामुस्लिमांच्या मदिना शहरात एकही मंदिर नाही. ख्रिश्चनांच्या व्हॅटिकन सिटीमध्येही एकही मंदिर नाही. मग अयोध्येतील राम मंदिराशेजारी मशिद उभारण्याचा आग्रह कशासाठी? हिंदू हे जगातील सर्वातसहिष्णू आहेत.रामजन्मभूमीवर मशिदीच्या आग्रहाने त्यांना असहिष्णू व्हायला भाग पाडू नका, असे इशारावजा आवाहन केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले. त्या म्हणाल्या की, अयोध्येतील वादग्रस्त जागा हेच प्रभू रामाचे जन्मस्थान आहे, हे निर्विवाद सत्य आहे.त्यामुळे आता तेथे मंदिरबांधणे हा श्रद्धेचा विषय नसून फक्त जमिनीचा वाद आहे. तो न्यायालयाबाहेर सोडविण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे आणि खास करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राम मंदिराचा शिलान्यास करून त्यांच्या पक्षाने पूर्वी केलेल्या पापांचे प्रायश्चित्त घ्यावे, असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या