शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘राम मंदिरासाठी हिंदू दीर्घकाळ प्रतीक्षा करु शकत नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 05:25 IST

अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी कायदा बनविण्याची मागणी विहिंपने केली असून, न्यायालयाच्या निर्णयासाठी हिंदू दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही, असेही विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी कायदा बनविण्याची मागणी विहिंपने केली असून, न्यायालयाच्या निर्णयासाठी हिंदू दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही, असेही विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले आहे.राम मंदिरासाठी वटहुकूम काढणार नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एका मुलाखतीत दिल्यानंतर राम मंदिराच्या मुद्द्यावर नव्याने प्रतिक्रिया येत आहेत. मंदिरासाठी कायदा बनवा, अशी मागणी यानिमित्ताने विहिंपने पुन्हा एकदा केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, राम मंदिरासाठी वटहुकमाबाबतचा निर्णय न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केला जाऊ शकतो; पण सरकार आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्व पावले उचलण्यास तयार आहे.विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार म्हणाले की, सर्व बाजूंनी विचार केल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे स्पष्ट मत आहे की,हिंदू समाजाकडून दीर्घकाळ न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. त्यामुळे संसदेत कायदा करून श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिराचामार्ग प्रशस्त करणे हाच यावर तोडगा आहे. ते म्हणाले की, आम्ही पंतप्रधानांचे श्रीराम जन्मभूमीसंबंधी वक्तव्य ऐकले. जन्मभूमीचे प्रकरण गेल्या ६९ वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. याचे अपील सर्वोच्च न्यायालयात २०११ पासून प्रलंबित आहे. प्रतीक्षेचा हा मोठा काळ आहे. हिंदू समाज दीर्घकाळापर्यंत प्रतीक्षा करू शकत नाही.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर