शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिंडेनबर्ग आणखी मोठा धक्का देण्याच्या तयारीत; पुढचा नंबर कोणाचा? ​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 08:20 IST

यापूर्वी २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत खुलासा केला होता. त्यामुळे या समूहाला मोठा झटका बसला आहे.

नवी दिल्ली : अदानी समूहातील हेराफेरीवर मोठा खुलासा करून बाजारविश्वात खळबळ माजवलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चने आणखी एका मोठ्या धक्क्याची पूर्वसूचना दिली आहे. हिंडेनबर्गने ट्वीट करत म्हटले की, लवकरच आणखी एक मोठे प्रकरण बाहेर येणार आहे. त्यामुळे नेमके हे प्रकरण कोणत्या कंपनीचे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यापूर्वी २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत खुलासा केला होता. त्यामुळे या समूहाला मोठा झटका बसला आहे.

पुढचा नंबर कोणाचा? हिंडेनबर्गच्या निशाण्यावर नेमके कोण आहे याबाबत ट्वीटमध्ये माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, गौतम अदानी यांच्या समूहातील हेराफेरी बाहेर काढल्यानंतर हिंडेनबर्ग आणखी एक हेराफेरी समोर आणण्याची शक्यता आहे.

अदानी पॉवरवर देखरेखअदानी समूहाच्या अदानी पॉवर कंपनीला दुसऱ्यांदा स्टॉक एक्स्चेंज,  बीएसई आणि एनएसईने देखरेखीखाली ठेवले आहे. स्टॉक एक्स्चेंजच्या मते, गुरुवारपासून (२३ मार्च) अदानी पॉवर अल्प मुदतीच्या एएसएम फ्रेमवर्कच्या पहिल्या टप्प्यात असेल. यापूर्वी अदानी एंटरप्रायझेस आणि विल्मर यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.

टॅग्स :Adaniअदानी