शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

हिमाचलच्या चंबा रुमालाची किंमत ३० हजार: विदेशातूनही आहे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 14:25 IST

एक चंबा रुमाल बनविण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागतो.

बलवंत तक्षक

चंडीगड : एखाद्या रुमालाची किंमत ३० हजार रुपये असू शकते का, अर्थातच उत्तर नाही असेल; पण हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला येथे रिज मैदानावर हस्तकला प्रदर्शनात भेट दिली तर येथे चंबा रुमालाची किंमत २५ ते ३० हजार रुपये असल्याचे दिसून येते.

एक चंबा रुमाल बनविण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागतो. या हस्तकला मेळ्यात हाताने बनविलेल्या वस्तू लोकांना आकर्षित करीत आहेत. या शिल्प मेळ्यात कुल्लू- किन्नौरी शॉलपासून ते चंबा रुमालपर्यंत अनेक वस्तू आहेत. हा मेळा पाच दिवस चालणार आहे. येथे एक डझनपेक्षा अधिक स्टॉल लागलेले आहेत. सर्वांत अधिक गर्दी चंबा रुमालाच्या स्टॉलवर दिसून येते.

कॉटन आणि खादीच्या रुमालावर रेशमाच्या धाग्यांनी केलेली कारागिरी पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. चंबा रुमाल बनविणाऱ्या कारागीर सुनीता म्हणतात की, रुमालावर भगवान श्रीकृष्ण, राधा आणि गोपी यांची रासलीला बनविण्यासाठी जवळपास एक महिना लागतो. यासाठी विशेष धागा अमृतसर येथून मागविला जातो. या रुमालांची विदेशातही खूप मागणी आहे. ही कला चंबा येथील महिलांनी आजही जिवंत ठेवली आहे.

बांबूचेही उत्पादनहस्तकला मेळ्यात बांबूचीही विक्री होत आहे. उना जिल्ह्यातील बंगाणा येथील अजय कुमार यांचे म्हणणे आहे की, बांबूपासून बनविलेल्या उत्पादनांची इतकी मागणी आहे की, कारागीर कमी पडतात. सध्या आमच्याकडे ३० हून अधिक महिला काम करीत आहेत. बांबू उद्योगातून युवकांना रोजगार देण्याचे अजय कुमार यांचे स्वप्न आहे. मात्र, तरुण मुले या क्षेत्रात येण्यासाठी इच्छुक नाहीत.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश